क्रिकेट जगतासाठी एक मोठी बातमी आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली २०२६ मध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी सहभागी होणाऱ्या सर्व २० संघांची नावे निश्चित झाली आहेत. संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईने पात्रता फेरीतून आपले स्थान निश्चित करत, या मोठ्या स्पर्धेच्या अंतिम २० संघांची यादी पूर्ण केली.
१६ ऑक्टोबर रोजी ओमानमधील अल-अमेरात क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या पूर्व आशिया पॅसिफिक क्वालिफायर २०२५ मधील सुपर सिक्स सामन्यात युएईने निर्णायक विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या युएईच्या गोलंदाजांनी जपानला २० षटकांत केवळ ११६ धावांवर रोखले. ११७ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना, कर्णधार मोहम्मद वसीम आणि अलिशान शारफू यांनी दमदार सुरुवात केली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ७० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. अखेरीस, युएईने १२.१ षटकांतच अवघे २ गडी गमावून हे लक्ष्य सहज गाठले आणि २०२६ च्या टी२० विश्वचषकात आपले तिकीट पक्के केले.
टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये सहभागी होणारे सर्व २० संघ
भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित होणाऱ्या २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी सर्व २० संघांच्या नावांमध्ये गतविजेता भारतासह श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, बांगलादेश, अमेरिका, वेस्ट इंडिज, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, कॅनडा, इटली, नेदरलँड्स, नामिबिया, झिम्बाब्वे, नेपाळ, ओमान आणि युएई यांचा समावेश आहे.
Web Summary : India and Sri Lanka host the 2026 T20 World Cup. UAE secures the final spot. Twenty teams, including India, Australia, England, Pakistan, and others, will participate in the tournament.
Web Summary : भारत और श्रीलंका 2026 टी20 विश्व कप की मेजबानी करेंगे। यूएई ने अंतिम स्थान हासिल किया। भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लैंड, पाकिस्तान सहित बीस टीमें टूर्नामेंट में भाग लेंगी।