Join us

U19 World Cup Final, IND vs ENG, LIVE Streaming: भारताची यंग ब्रिगेड आज इंग्लंडशी करणार दोन हात! कधी आणि कुठे बघाल फायनल

भारतीय संघ स्पर्धेत अद्याप एकही सामना हरलेला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 09:29 IST

Open in App

U19 World Cup स्पर्धेचा अंतिम सामना आज होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध (India vs England) खेळणार आहे. भारतीय संघाने आतापर्यंत चार वेळ विश्वचषक उंचावला आहे, पण आज यंग ब्रिगे़डची नजर आपल्या पाचव्या विजेतेपदावर असणार आहे. संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियाने कोरोनाशी झुंज दिली. उपांत्य फेरीपूर्वी संघ पूर्णपणे सावरला. महत्त्वाची बाब म्हणजे भारतीय संघ या स्पर्धेत आतापर्यंत अजिंक्य आहे. भारताने साखळी फेरीतील सर्व सामने जिंकले. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेशचा पराभव केला आणि उपांत्य फेरीत बलाढ्य ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. त्यामुळे आज हा विजयरथ इंग्लंड रोखणार की भारत पाचव्या विजेतेपदावर नाव कोरणार, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

कर्णधार यश धुलच्या शानदार शतकाच्या जोरावर भारताने इंग्लंडचा ९६ धावांनी पराभव करत सलग चौथ्यांदा U19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. धुलने ११० चेंडूत ११० धावा केल्या आणि उपकर्णधार शेख रशीदसोबत २०४ धावांची भागीदारी केली. राशिदने १०८ चेंडूत ९४ धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना दोघांनी संघाला २९० धावांपर्यंत मजल मारून दिली. यानंतर भारतीय गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली. त्यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव ४१.५ षटकांत १९४ धावांमध्ये गुंडाळला. इंग्लंडकडून फक्त लचलान शॉ ५१ धावा करू शकला. त्यामुळे भारताने फायनलमध्ये प्रवेश केला.

भारत आणि इंग्लंड यांच्यात U19 विश्वचषकाचा अंतिम सामना कधी होणार?- > भारत आणि इंग्लंड यांच्यात आज संध्याकाळी U19 विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील U19 विश्वचषकाचा अंतिम सामना कुठे खेळवला जाईल?-> भारत आणि इंग्लंड यांच्यातील U19 फायनल अँटिग्वा येथील व्हिव्हियन रिचर्ड्स मैदानावर खेळवली जाणार आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील U19 विश्वचषकाचा अंतिम सामना किती वाजता सुरू होईल?-> भारतीय वेळेनुसार, भारत आणि इंग्लंड यांच्यात U19 विश्वचषकाचा अंतिम सामना संध्याकाळी ६.३० वाजता सुरू होईल. टॉस संध्याकाळी ६ वाजता होईल.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील U19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठे पाहता येईल?-> भारत आणि इंग्लंड यांच्यातील U19 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील U19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे Live Streaming कोणत्या अँपवर पाहता येईल?-> भारत आणि इंग्लंड यांच्यातील U19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण Hotstar वर होणार आहे.

टॅग्स :19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक फायनलभारतीय क्रिकेट संघइंग्लंड
Open in App