पाकिस्तानी फलंदाजाने मारलेला खराब फटका पाहून भारतीय कर्णधार झाला नाराज (Video Viral)

Team India Captain Uday Saharan AUS vs PAK Semifinal, U19 World Cup 2024: स्वत: ICC या संबधीचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 11:31 AM2024-02-09T11:31:18+5:302024-02-09T11:32:51+5:30

whatsapp join usJoin us
u19 India team captain Uday Saharan reaction on Pakistan batsmen vs Australia in semifinal u19 world cup 2024 | पाकिस्तानी फलंदाजाने मारलेला खराब फटका पाहून भारतीय कर्णधार झाला नाराज (Video Viral)

पाकिस्तानी फलंदाजाने मारलेला खराब फटका पाहून भारतीय कर्णधार झाला नाराज (Video Viral)

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Team India Captain Uday Saharan AUS vs PAK Semifinal, U19 World Cup 2024: सध्या अंडर-19 विश्वचषक 2024चे आयोजन दक्षिण आफ्रिकेत सुरु आहे. याआधी भारतीय संघाने उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव केला. ऑस्ट्रेलियाने हा सामना १ गडी राखून सामना जिंकला आणि भारताविरूद्ध अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाची सुरुवात खूपच खराब झाली आणि संपूर्ण संघ ४८.५ षटकात १७९ धावांवरच आटोपला. या सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजीतील एक क्षण पाहून भारतीय फलंदाज नाराज झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.

नक्की काय घडला?

पाकिस्तानी फलंदाजांनी अतिशय खराब शॉट्स खेळले आणि त्यांच्या विकेट्स गमावल्या. या दरम्यान, स्टेडियममध्ये सामना पाहणारा भारतीय कर्णधार उदय सहारनची एक प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना पाकिस्तानच्या डावादरम्यान १९व्या षटकात घडली. पाकिस्तान संघाने ५३ धावांवर चौथी विकेट गमावली होती. ही विकेट अहमद हसनची होती. फिरकीपटू राफे मॅकमिलनच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर स्वीप शॉट खेळताना तो एलबीडब्ल्यू आऊट झाला. अहमदने १७ चेंडूत ४ धावा केल्या होत्या. या दरम्यान, उदय सहारन आपल्या सहकारी खेळाडूंसोबत सीमारेषेच्या बाहेर उभा होता. सहारन पाकिस्तानी फलंदाजाच्या फटक्यावर खूश दिसला नाही. त्याच्या खराब शॉट निवडीबद्दल तो आपल्या सहकाऱ्याशी बोलताना दिसला. हे सर्व कॅमेरामनने टिपले होते, जे आयसीसीनेच शेअर केले आहे. आता हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

सामन्यात पाकिस्तान संघाची अवस्था खूपच वाईट दिसली. त्यांनी अवघ्या ७९ धावांत पाच विकेट गमावल्या होत्या. यानंतर अझान अवेस (52) आणि अराफत मिन्हास (५२) यांनी अर्धशतके झळकावून पाकिस्तानला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. प्रथम खेळताना पाकिस्तानने ४८.५ षटकांत सर्वबाद १७९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून टॉम स्ट्रेकरने २४ धावांत सर्वाधिक ६ बळी घेतले. १८० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाने अखेरच्या षटकात ९ गडी गमावून १८१ धावा करत सामना जिंकला. अशा प्रकारे कांगारू संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ऑस्ट्रेलियाकडून हॅरी डिक्सनने सर्वाधिक ५० आणि ऑलिव्हर पीकने ४९ धावांची खेळी खेळली. तर पाकिस्तानकडून वेगवान गोलंदाज अली रझाने सर्वाधिक ४ बळी घेतले. फिरकीपटू अराफत मिन्हासने २ बळी घेतले.

 

Web Title: u19 India team captain Uday Saharan reaction on Pakistan batsmen vs Australia in semifinal u19 world cup 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.