Join us
Daily Top 2Weekly Top 5

Vaibhav Suryavanshi Century: वैभव सूर्यवंशीचं ऐतिहासिक शतक, षटकार, चौकारांची बरसात करत फायनलमध्ये केला विश्वविक्रम

U19 Cricket World Cup final, Vaibhav Suryavanshi Century: भारत आणि इंग्लंडच्या संघांमध्ये सुरू असलेल्या १९ वर्षांखालील मुलांच्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा विस्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी याने ऐतिहासिक शतकी खेळी केली आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 14:56 IST

Open in App

भारत आणि इंग्लंडच्या संघांमध्ये सुरू असलेल्या १९ वर्षांखालील मुलांच्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा विस्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी याने ऐतिहासिक शतकी खेळी केली आहे.  भारतीय क्रिकेटमधील उगवता सितारा म्हणून पाहिलं जात असलेल्या वैभव सूर्यवंशी याने अंतिम लढतीत आपल्या घणाघाती फलंदाजीचं दर्शन घडवलं. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यावर वैभवने सुरुवातीपासूनच षटकार, चौकारांची बरसात करत शतकी खेळी साकारली. त्याने अवघ्या ५५ चेंडूत १००  धावा कुटून काढत नवा इतिहास रचला. वैभव हा १९ वर्षांखालील मुलांच्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत शतकी खेळी करणारा सर्वात कमी वयाचा फलंदाज ठरला . वैभव सूर्यवंशीच्या शतकाच्या जोरावर भारतीय संघाने अखेरचं वृत्त येईपर्यंत २० षटकांत दोन बाद १६७ धावांपर्यंत मजल मारली होती.

सलग सहाव्यांदा १९ वर्षांखालील मुलांच्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक देणााऱ्या भारतीय संघाची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यावर सुरुवात तितकीशी चांगली झाली नव्हती. वैभव सूर्यवंशीसोबत डावाची सुरुवात करण्यासाठी आलेला आरोन जॉर्ज अवघ्या ९ धावा काढून माघारी परतला. त्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रे यांनी इंग्लिश गोलंदाजांवर जोरदार प्रतिहल्ला चढवत भारतीय संघाचा डाव सावरला. यादरम्यान, वैभव सूर्यवंशी याने अधिक आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत होते.

वैभवने ३२ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. मात्र अर्धशतक पूर्ण केल्यावर त्याची बॅट आणखीनच तळपली.  समोर येईल त्या इंग्लिश गोलंदाजाला झोडपून काढत त्याने  मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. वैभवच्या या आक्रमणामुळे भारतीय संघाचा धावफलकही वाऱ्याच्या वेगाने दीडशेपार गेला. यादरम्यान, एक बाजू लावून धरणाऱ्या कर्णधार आयुष म्हात्रे याने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. मात्र लगेच तो ५३ धावांवर बाढ झाला. वैभव आणि आयुष यांनी दुसऱ्या विकेटसाठी १४२ धावांची भागीदारी केली.

यादरम्यान, शतकाच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या  वैभवने एकेरी दुहेरी धावा घेत ५५ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. या दरम्यान त्याने ८ चौकार आणि ८ षटकार ठोकले.  तसेच १९ वर्षांखालील मुलांच्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत शतकी खेळी करणारा वैभव सूर्यवंशी हा सर्वात कमी वयाचा फलंदाज ठरला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Vaibhav Suryavanshi's Record Century Propels India to U-19 World Cup Final

Web Summary : Vaibhav Suryavanshi's explosive century powered India to a strong position in the U-19 World Cup final against England. His 55-ball hundred, featuring eight fours and eight sixes, helped India reach 167/2 in 20 overs, setting a new record for the youngest player to score a century in the final.
टॅग्स :वैभव सूर्यवंशी19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक फायनलभारत विरुद्ध इंग्लंडभारतीय क्रिकेट संघ