ट्वेन्टी-२० सामना खेळून परतत असताना अपघातात दोन क्रिकेटपटू ठार

कार संरक्षक भिंतीवर आदळली :यवतळमाळ येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2019 20:38 IST2019-12-28T20:36:51+5:302019-12-28T20:38:43+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Two cricketers of Wardha were killed in a car crash near Yavatmal | ट्वेन्टी-२० सामना खेळून परतत असताना अपघातात दोन क्रिकेटपटू ठार

ट्वेन्टी-२० सामना खेळून परतत असताना अपघातात दोन क्रिकेटपटू ठार

यवतमाळ : भरधाव कार पुलाच्या संरक्षक भिंतीवर आदळून झालेल्या अपघातात वर्धा येथील दोन क्रिकेट खेळाडू ठार झाले. ही घटना शनिवारी संध्याकाळी येथील चापडोह पुनर्वसनजवळ घडली. जयेश प्रवीण लोहिया (११) व अक्षद अभिषेक बैद (११) रा.रामनगर वर्धा अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत. हे दोघेही क्रिकेट खेळाडू होते. या घटनेत इतर चार जण जखमी झाले.


यवतमाळ येथे टी-२० क्रिकेट सामने होत आहे. यात सहभागी होण्यासाठी रामनगर वर्धा येथील ब्रदरहूड क्रिकेट संघ येथे दाखल झाला होता. सामने खेळून या चमूतील काही खेळाडू वर्धा येथे एम.एच.३२/एएच-३७७७ या क्रमांकाच्या कारने निघाले होते. चापडोह गावाकडून बायपासने वर्धाकडे जात असताना पुलासाठी बांधलेल्या संरक्षक भिंतीवर ही कार आदळली. यात जयेश आणि अक्षद हे दोघे ठार झाले. 
जयेशचे वडील प्रवीण लोहिया हे कार चालवित होते. त्यांचे नियंत्रण सुटल्याने कार संरक्षक भिंतीवर आदळली. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी मदत करून जखमींना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेचा पुढील तपास अवधूतवाडी पोलिसांनी सुरू केला आहे.

Web Title: Two cricketers of Wardha were killed in a car crash near Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.