Join us

शिवजयंती निमित्त ट्विट करत विरेंद्र सेहवाग म्हणाला, "इतिहास चुकीचा होता..."

Virender Sehwag Tweets On Shivjayanti : शिवजयंतीच्या निमित्ताने भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने एक ट्विट केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 07:46 IST

Open in App
ठळक मुद्देविरेंद्र सेहवागच्या या ट्विटला जवळपास ७५ हजारहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील अनेक भागांत आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये चक्क इतिहास चुकीचा होता, असे विरेंद्र सेहवागने म्हटले आहे. दरम्यान, विरेंद्र सेहवागचे हे ट्विट आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Virender Sehwag Tweets On Shivjayanti And Said History Was Wrong )

ट्विटमध्ये विरेंद्र सेहवाग म्हणाला, "शक्तीशाली लोकं ही शक्तीशाली जागेमधूनच येतात, असे इतिहासाने आपल्याला सांगितले. मात्र, इतिहास चुकीचा होता. शक्तीशाली लोकं ही जागा शक्तीशाली बनवतात." याचबरोबर, विरेंद्र सेहवागने शिवजयंतीच्या निमित्ताने महान छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत 'जय माँ भवानी', असे लिहिले आहे.

विरेंद्र सेहवागच्या या ट्विटला जवळपास ७५ हजारहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. तसेच, अनेकांनी विरेंद्र सेहवागचे हे ट्विट रिट्विट केले आहे. त्यामुळे सोशल मीडियात विरेंद्र सेहवागचे हे ट्विट चांगलेच मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, विरेंद्र सेहवाग नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्याचे दिसून येते. तो अनेक घडामोडींवर ट्विट करत असतो आणि त्याच्या या ट्विट्सना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला आहे.

टॅग्स :विरेंद्र सेहवागट्विटरछत्रपती शिवाजी महाराज