VIDEO: बाबाजी का ठुल्लू... विराट कोहलीचे मजेशीर हावभाव, विकेट पडताच मैदानात धमाल-मस्ती

Virat Kohli Funny moment video: विराटच्या दमदार शतकानंतरही भारताचा दुसऱ्या वनडेत पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 12:44 IST2025-12-04T12:43:56+5:302025-12-04T12:44:55+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
trending virat kohli funny gesture after quinton de cock wicket catch arshdeep singh viral social media | VIDEO: बाबाजी का ठुल्लू... विराट कोहलीचे मजेशीर हावभाव, विकेट पडताच मैदानात धमाल-मस्ती

VIDEO: बाबाजी का ठुल्लू... विराट कोहलीचे मजेशीर हावभाव, विकेट पडताच मैदानात धमाल-मस्ती

Virat Kohli Funny moment video: दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात पाच बाद ३५८ धावा करून आफ्रिकेला ३६९ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने चार चेंडू राखून सामना जिंकला आणि परदेशी मैदानावर सर्वात मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम केला. या विजयामुळे वनडे मालिका १-१ अशी बरोबरीत असून तिसरा सामना निर्णय ठरणार आहे. दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीने फलंदाजीत आपली चमक दाखवत सलग दुसरे शतक ठोकले. त्यानंतर क्षेत्ररक्षण करताना विराट कोहली चर्चेत आला. त्याची एक कृती मजेशीर ठरली, ज्याचा व्हिडिओही व्हायरल झाला.

दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉक कर्णधार एडन मार्करम याच्यासोबत फलंदाजीसाठी आला. दोघांनी सावध सुरुवात केली. अर्शदीप सिंगच्या चेंडूवर दोन चौकार लगावल्या नंतर क्विंटन डि कॉक फटकेबाजीच्या मूडमध्ये होता. त्याच वेळी अर्शदीप सिंगने चालाखीने गोलंदाजीच्या वेगात बदल करून चेंडू टाकला. चेंडू नीट न समजल्याने फटका मारल्यावर चेंडू हवेत उडाला आणि वॉशिंग्टन सुंदरने त्याचा झेल टिपला. डी कॉक बाद झाल्यामुळे साऱ्यांनाच आनंद झाला. त्यात विराट कोहलीच्या कृतीने विशेष लक्ष वेधून घेतले. विराटने 'बाबाजी का ठुल्लू' म्हणून प्रसिद्ध मीमचे हावभाव करत आनंद साजरा केला. त्याचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

दरम्यान, विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड या दोघांनीही दमदार फलंदाजी केली. त्यामुळे भारतीय संघाने ३५० पार मजली मारली होती. पण भारताने दिलेल्या महाकाय आव्हानाचा गोलंदाजांना बचाव करता आला नाही. शेवटच्या षटकापर्यंत भारतीय गोलंदाज प्रयत्न करत होते. पण अखेर ४ चेंडू राखून आफ्रिकेने सामना जिंकला. कर्णधार मार्करमने दमदार शतक ठोकले. त्यासोबतच मॅथ्यू ब्रीट्झके (६८), डेवाल्ड ब्रेव्हिस (५४) आणि टेम्बा बवुमा (४६) यांनीही विजयात मोलाचा वाटा उचलला.

Web Title : विराट कोहली की मजेदार हरकतें: 'बाबाजी का ठुल्लू' सेलिब्रेशन वायरल

Web Summary : दक्षिण अफ्रीका के खिलाफ दूसरे वनडे में विकेट गिरने के बाद विराट कोहली का 'बाबाजी का ठुल्लू' जेस्चर वायरल हो गया। दक्षिण अफ्रीका ने विशाल लक्ष्य का पीछा करते हुए 1-1 से श्रृंखला बराबर कर ली। कोहली ने शतक बनाया, लेकिन दक्षिण अफ्रीका के बल्लेबाजों का दबदबा रहा।

Web Title : Virat Kohli's Funny Antics: 'Babaji ka Thullu' Celebration Goes Viral

Web Summary : Virat Kohli's 'Babaji ka Thullu' gesture after a wicket in the second ODI against South Africa went viral. South Africa won, leveling the series 1-1, chasing a massive target. Kohli scored a century, but South Africa's batsmen dominated.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.