Virat Kohli Travis Head, IND vs AUS 2nd ODI: दुसऱ्या वनडेमध्ये भारतीय संघाने झुंजार लढत दिली, पण शेवटच्या टप्प्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी उत्तम खेळ करत सामना जिंकला. भारताने प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मा (७३), श्रेयस अय्यर (६१) आणि अक्षर पटेल (४४) यांच्या खेळींच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला २६५ धावांचे आव्हान दिले. याचा पाठलाग करताना मॅथ्यू शॉर्ट (७४), कूपर कोनॉली (नाबाद ६१) आणि मिचेल ओवन (३६) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला. सामन्यात विराट कोहली शून्यावर बाद झाला, पण सध्या तो ट्रेव्हिस हेडच्या विकेटमुळे चर्चेत आहे. त्याचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
विराटने ट्रेव्हिस हेडला काय सांगितलं?
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मार्श स्वस्तात बाद झाला. त्यानंतर १३व्या षटकात ट्रेव्हिस हेड झेलबाद झाला. त्याआधी घडलेला किस्सा चर्चेत आहे. १२वे षटक संपले तेव्हा ट्रेव्हिस हेड पिचच्या बाजूने चालत होता. त्याचवेळी विराट कोहली त्याच्या जवळ गेला, त्याच्या गळ्यात हात घालून त्याच्याशी काही सेकंद गप्पा मारल्या आणि निघून गेला. त्यानंतर १३वे षटक सुरू झाले. हर्षित राणाच्या पहिल्या चेंडूवर शॉर्टने एक धाव घेतला. दुसऱ्या चेंडूसाठी ट्रेव्हिस हेड फलंदाजीला आला. त्याचवेळी राणाने चेंडू टाकला, ट्रेव्हिस हेड फसला आणि त्याचा उंच उडलेला झेल विराट कोहलीने टिपला. पाहा व्हिडीओ-
याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर लोकांचे म्हणणे आहे की, विराट कोहलीने ट्रेव्हिस हेडला असे काहीतरी सांगितले की ज्याने त्याचे लक्ष विचलित झाले आणि तो बाद झाला. ट्रेव्हिस हेडने संयमी सुरूवात केली होती. सलामीवीर म्हणून तो खेळपट्टीवर स्थिरावण्याचा प्रयत्न करत होता. पण अखेर ४० चेंडूत १ चौकार आणि १ षटकार खेचून तो २८ धावांवर बाद झाला.