Join us
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...

Hardik Pandya Mahieka Sharma Video: पापाराझी दिसताच हार्दिक पांड्या बनला 'प्रोटेक्टिव्ह' बॉयफ्रेंड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 19:34 IST

Open in App

Hardik Pandya Mahieka Sharma Video: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या त्याच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. सध्या हार्दिकचे नाव बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल माहिका शर्माशी जोडले जात आहे. ते दोघेही अनेकदा एकमेकांसोबत दिसतात. हार्दिकने तिच्यासोबतचे आपले नाते लपवून ठेवलेले नाही. उघडपणे तो तिच्या नावाचा उल्लेख करत असतो. तसेच, आपल्या घरी धार्मिक कार्यासाठीही हार्दिक माहिकाला घेऊन गेल्याचे फोटो व्हायरल झाले होते. तशातच आता या लव्ह बर्ड्सचा आणखी एक छानसा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

अलीकडेच, हे जोडपे मुंबईत एका रोमँटिक डेट नाईटवर दिसले. हार्दिक आपली लेडी लव्ह माहिकाला ख्रिसमस डिनरसाठी एका आलिशान हॉटेलात घेऊन गेला होता. डिनर डेट झाल्यानंतर हार्दिक आणि माहिका बाहेर पडले. हार्दिकची कार बाहेर उभी होती, त्यामुळे पापाराझींची चांगलीच गर्दी झाली होती. हार्दिक माहिकाला घेऊन बाहेर पडला तेव्हा गर्दी पाहून तो थांबला. मग हार्दिकने अतिशय प्रेमाने त्याची गर्लफ्रेंड माहिकाला प्रोटेक्ट करत कारपर्यंत नेले आणि कारमध्ये बसवले. त्यानंतर हार्दिकने काही फॅन्सना सेल्फी दिली आणि मग तोही कारमध्ये बसून निघून गेला. त्याचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.

पापाराझीवर चिडला होता हार्दिक पांड्या...

काही दिवसांपूर्वी माहिका शर्मा एकटी एका बिल्डिंगमधून बाहेर येत होती. ती पायऱ्या उतरताना पापाराझीने तिचे चुकीच्या अँगलने फोटो, व्हिडीओ काढले. त्यावरून हार्दिक चांगलाच संतापला होता. हार्दिकने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले होते, "मला माहित आहे की सेलिब्रिटींचे जीवन सार्वजनिक पद्धतीने चर्चेत असते. अशा लोकांकडे खूप लक्ष वेधले जाते. पण कधीकधी मर्यादा ओलांडली जाते. आजही असेच काहीतरी घडले जे मर्यादा ओलांडल्यासारखे होते. माहिका वांद्रे येथील एका रेस्टॉरंटमध्ये पायऱ्या उतरत असताना पापाराझीने तिला अशा अँगलने क्लिक केले, ज्याप्रकारे तिचे फोटो काढणे किंवा व्हिडीओ शूट करणे योग्य नव्हते. महिलेचे अशा प्रकारे फोटो काढणे आणि ते उगाच व्हायरल करणे हा फारच विचित्र प्रकार आहे. अशी विकृत मानसिकतेता फारच चुकीची आहे."

English
हिंदी सारांश
Web Title : Hardik Pandya protects girlfriend Mahieka Sharma from paparazzi in Mumbai.

Web Summary : Hardik Pandya and Mahieka Sharma were spotted on a romantic dinner date in Mumbai. Pandya lovingly shielded Sharma from the paparazzi, ensuring she safely entered their car. He also took selfies with fans before leaving.
टॅग्स :हार्दिक पांड्यासोशल व्हायरलसोशल मीडियाव्हायरल व्हिडिओऑफ द फिल्ड