Join us
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: भन्नाट!! फलंदाजाने मारला जोरदार फटका, चेंडू हवेत जाताच उडी घेतला टिपला अफलातून झेल

Cricket Catch Video: टॉम रॉजर्सचा हवेत झेप घेत 'सुपरमॅन' कॅच, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 14:34 IST

Open in App

Cricket Catch Video: ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत वन-डे कप (Marsh Cup) मध्ये विक्टोरिया आणि क्वीन्सलँड यांच्यातील सामन्यात टॉम रॉजर्स (Tom Rogers) याने मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne) याचा एक अविश्वसनीय झेल टिपला. क्रिकेटच्या मैदानात अनेकदा असे काही क्षण पाहायला मिळतात जे पाहून डोळ्यांवर विश्वास बसत नाही. असाच एक चित्तथरारक झेल ऑस्ट्रेलियाच्या 'वन-डे कप' मध्ये पाहायला मिळाला. विक्टोरियाच्या टॉम रॉजर्सने क्वीन्सलँडचा कर्णधार मार्नस लाबुशेनचा एक हाताने हवेत झेप घेत घेतलेला झेल सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

रॉजर्सचा अप्रतिम झेल

क्वीन्सलँडच्या डावातील सहाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर लाबुशेनने एक जोरदार शॉट खेळला. चेंडू अत्यंत वेगाने सीमारेषेकडे जात होता, मात्र तिथे तैनात असलेल्या टॉम रॉजर्सने आपल्या डाव्या बाजूला हवेत मोठी झेप घेतली आणि चक्क एका हाताने चेंडू टिपला. हा चेंडू इतका वेगवान होता की लाबुशेनसह मैदानावरील सर्व खेळाडू झेल पाहून अवाक झाले. या अप्रतिम झेलमुळे मार्नस लाबुशेन अवघ्या ४ धावांवर (९ चेंडू) माघारी परतला. या झेलचा व्हिडिओ cricket.com.au ने शेअर केला असून, चाहत्यांनी टॉम रॉजर्सच्या या चपळाईचे भरभरून कौतुक केले आहे.

लाबुशेनच्या विकेटमुळे क्वीन्सलँडची स्थिती १७ धावांवर ३ बाद अशी बिकट झाली होती. या झेलसह टॉम रॉजर्सने आपल्या लिस्ट-ए (List-A) क्रिकेट कारकिर्दीतील १० झेल पूर्ण केले. त्याने २०२३ मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.

दरम्यान, क्वीन्सलँडचा संघ ४९ षटकांत २१५ धावांवर गारद झाला. त्यांच्याकडून जिमी पीअर्सनने सर्वाधिक ६५ धावा केल्या. विक्टोरियाकडून फिरकीपटू टॉड मर्फीने १० षटकांत २९ धावा देऊन ३ बळी घेतले. त्यामुळे विक्टोरियासमोर विजयासाठी २१६ धावांचे माफक लक्ष्य उभे राहिले.

English
हिंदी सारांश
Web Title : Spectacular catch: Rogers stuns Labuschagne in Marsh Cup thriller.

Web Summary : Tom Rogers' incredible one-handed catch dismissed Marnus Labuschagne in a Marsh Cup match between Victoria and Queensland. Rogers' stunning effort left everyone amazed, contributing to Queensland's collapse to 215 all out. Victoria now chases 216 for victory.
टॅग्स :व्हायरल व्हिडिओऑफ द फिल्डसोशल मीडियासोशल व्हायरल