तामिळनाडू : भारतीय संघाचा सलामीवीर मुरली विजयनं शनिवारी तामिळनाडू प्रीमिअर लीगमध्ये चक्क डावखुरी फलंदाजी केली. रबी ट्रिची वॉरियर्स संघाचे प्रतिनिधित्व करताना प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाज आर अश्विनचा सामना करण्यासाठी डावखुरी फलंदाजी केली. डिंडीगूल ड्रॅगन्स संघाविरुद्धच्या या सामन्यात विजयला एका धावेनं शतकानं हुलकावणी दिली. अखेरच्या षटकात तो 99 धावांवर बाद झाला. मात्र, त्याच्या या खेळीच्या जोरावर वॉरियर्स संघाने निर्धारीत 20 षटकांत 3 बाद 178 धावा केल्या.
![]()
प्रथम फलंदाजीला आलेल्या वॉरियर्सला मुकुंथ के आणि
मुरली विजय यांनी दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 106 धावा जोडल्या. मुकुंथने 40 चेंडूंत 43 धावा केल्या. त्यानंतर गणपथी चंद्रसेकर ( 9) अपयशी ठरला. पण, विजयनं एका बाजूनं फटकेबाजी सुरू ठेवली. त्यानं 62 चेंडूंत 7 चौकार व 7 षटकार खेचून 99 धावा केल्या. मणी भारथीने 4 चेंडूंत 1 चौकार व 2 षटकार खेचून नाबाद 18 धावा केल्या.
पाहा व्हिडीओ...