धोनीने दिल्या टिप्स, एजबस्टन येथे टीम इंडियाशी संवाद

शनिवारी एजबस्टन येथे झालेल्या या सामन्यादरम्यान धोनी स्टेडियममध्ये उपस्थित राहिला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 08:31 IST2022-07-11T08:31:16+5:302022-07-11T08:31:16+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Tips from former captain ms Dhoni to Team India players at england | धोनीने दिल्या टिप्स, एजबस्टन येथे टीम इंडियाशी संवाद

धोनीने दिल्या टिप्स, एजबस्टन येथे टीम इंडियाशी संवाद

बर्मिंगहॅम : इंग्लंडविरुद्धचा दुसरा टी-२० सामना सहजपणे जिंकल्यानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने भारतीय संघाशी विशेष संवाद साधला. रोहित शर्माच्या नेतृत्त्वामध्ये भारताने आक्रमक खेळी केली होती.

शनिवारी एजबस्टन येथे झालेल्या या सामन्यादरम्यान धोनी स्टेडियममध्ये उपस्थित राहिला होता. सामना संपल्यानंतर धोनीने इशान किशन आणि युझवेंद्र चहल यांच्यासोबत संवाद साधला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही (बीसीसीआय) धोनीचा खेळाडूंशी संवाद साधतानाचा फोटो ट्वीट केला. यष्टीरक्षक - फलंदाज ऋषभ पंत यानेही आपल्या आदर्श खेळाडूसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ड्रेसिंग रुममध्ये धोनी खेळाडूंशी संवाद साधत असल्याचा फोटो पोस्ट करत बीसीसीआयने ट्वीट केले की, ‘जेव्हा धोनी बोलत असतो, तेव्हा सर्वजण त्याचे ऐकत असतात.’

धोनी सध्या ब्रिटनमध्ये आपल्या कुटुंबीयांसोबत असून, त्याने काही दिवसांपूर्वी विम्बल्डन टेनिस ग्रँडस्लॅम सामन्याचाही आनंद घेतला.

 

Web Title: Tips from former captain ms Dhoni to Team India players at england