Tim David six hitting Video: 6 6 6 6 .... Mumbai Indians च्या फलंदाजाने पाकिस्तानी गोलंदाजाला धू धू धुतलं, ठोकलं सर्वात जलद अर्धशतक

तुफान फलंदाजी करत संघाला गाठून दिली २००पार मजल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 05:27 PM2023-03-08T17:27:28+5:302023-03-08T17:28:27+5:30

whatsapp join usJoin us
Tim David six hitting Video: 6 6 6 6 .... The batsman of Mumbai Indians bowled the Pakistani bowler. | Tim David six hitting Video: 6 6 6 6 .... Mumbai Indians च्या फलंदाजाने पाकिस्तानी गोलंदाजाला धू धू धुतलं, ठोकलं सर्वात जलद अर्धशतक

Tim David six hitting Video: 6 6 6 6 .... Mumbai Indians च्या फलंदाजाने पाकिस्तानी गोलंदाजाला धू धू धुतलं, ठोकलं सर्वात जलद अर्धशतक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Tim David six hitting Video: पाकिस्तानात सध्या PSL 2023 ची धूम सुरू आहे. या स्पर्धेत २४व्या सामन्यात मुलतान सुलतान्सचा संघ हरला. पण तरीही त्यांच्याकडून खेळणाऱ्या आणि IPL मध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) कडून खेळणारा फलंदाज टिम डेव्हिड याने सर्वांची मने जिंकली. पाकिस्तान सुपर लीगच्या 8 व्या मोसमातील पहिला सामना खेळण्यासाठी आलेल्या टीम डेव्हिडने इस्लामाबाद युनायटेडच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. टीम डेव्हिडने केवळ 27 चेंडूत 5 षटकार आणि 4 चौकार मारत 60 धावा केल्या. टीम डेव्हिडच्या फलंदाजीच्या जोरावर मुलतान सुल्तान्सच्या संघाने २०५ धावांपर्यंत मजल मारली, तरीही शेवटी इस्लामाबादने हे लक्ष्य एक चेंडू आधी गाठले.

टीम डेव्हिडबद्दल सांगायचे तर या खेळाडूने पाकिस्तानी वेगवान गोलंदाज रुमन रईसची धुलाई केली. रुमनच्या एका षटकात टीम डेव्हिडने सलग चार षटकार ठोकले आणि एकूण ३० धावा मिळवल्या. या षटकात रुमनला 4 षटकार आणि एक चौकार बसला. रुमन रईसने दोन षटकांत केवळ १३ धावा दिल्या होत्या आणि त्यानंतर इस्लामाबादचा कर्णधार शादाबने त्याला चेंडू दिला. पण त्याचा डाव फसला. कारण रुमनचा पहिला चेंडू वाईड होता. यानंतर शान मसूदने पहिल्या चेंडूवर चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. टीम डेव्हिड जेव्हा स्ट्राईकवर आला तेव्हा त्याने अप्रतिम फटके खेळत रुमन रईसच्या चार चेंडूत चार षटकार ठोकले. टीम डेव्हिडच्या फटकेबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

टिम डेव्हिडचे वादळ

टीम डेव्हिडने अवघ्या 20 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. पाकिस्तान सुपर लीगच्या या हंगामातील हे सर्वात जलद अर्धशतक देखील आहे. टीम डेव्हिडचा पीएसएल रेकॉर्ड अप्रतिम आहे. या खेळाडूने या लीगमध्ये 18 डावांमध्ये 43.16 च्या सरासरीने 518 धावा केल्या आहेत. टीम डेव्हिडचा स्ट्राइक रेट 186 आहे आणि त्याने 50 धावांच्या चारपेक्षा जास्त डाव खेळले आहेत.

Web Title: Tim David six hitting Video: 6 6 6 6 .... The batsman of Mumbai Indians bowled the Pakistani bowler.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.