अव्वल दहामध्ये आले तीन भारतीय फलंदाज

क्रमवारी; गिल, रोहित, कोहली चमकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 06:00 IST2023-10-19T05:59:48+5:302023-10-19T06:00:05+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Three Indian batsmen came in the top ten, icc world cup | अव्वल दहामध्ये आले तीन भारतीय फलंदाज

अव्वल दहामध्ये आले तीन भारतीय फलंदाज

दुबई : भारतात सुरू असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत शुभमन गिल, कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली शानदार फॉर्ममध्ये आहेत. या जोरावर त्यांनी नव्याने जाहीर झालेल्या आयसीसी एकदिवसीय सामन्यांच्या क्रमवारीत अव्वल दहामध्ये स्थान पटकावले आहे. शुभमनने दुसरे स्थान कायम राखले असताना रोहित व विराट यांनी अनुक्रमे सहावे व आठवे स्थान पटकावले. 

यासह भारतीयांनी मिळून एक वेगळा पराक्रम केला आहे. रोहितसह दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डीकॉकनेही क्रमवारीत सुधारणा करत तिसरे स्थान पटकावले. त्याने     संघ सहकारी रॅसी व्हॅन डेर ड्युसेन याला चौथ्या क्रमांकावर ढकलले. 

रोहित सहाव्या क्रमांकावर 
असून, कोहली आठव्या क्रमांकावर आहे. अव्वल दहा फलंदाजांमध्ये तीन भारतीय आहेत आणि असा पराक्रम अन्य संघांना जमलेला नाही. पाकिस्तानचा कर्णधार बाबर 
आजम ८३६ रेटिंग गुणांसह 
अव्वल स्थानावर कायम आहे. त्याने गिलवर १८ गुणांनी आघाडी 
घेतली आहे. 

सिराज अव्वल भारतीय
गोलंदाजांमध्ये मोहम्मद सिराज अव्वल भारतीय ठरला असून, तो दुसऱ्या स्थानी आहे. फिरकीपटू कुलदीप यादव आठव्या स्थानी आहे. जसप्रीत बुमराहने एका स्थानाने प्रगती करताना ११वे स्थान पटकावले. ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड अव्वल स्थानी कायम आहे. अफगाणिस्तानचे राशिद खान (४), मुजीब उर रहमान (५) व मोहम्मद नबी (१०) हे अव्वल दहामध्ये आहेत. 

हार्दिक नवव्या स्थानी
अष्टपैलूंच्या अव्वल दहा स्थानांमध्ये एकमेव भारतीय म्हणून केवळ हार्दिक पांड्या आहे. तो नवव्या स्थानी आहे. बांगलादेशचा शाकिब अल हसन याने आपले अव्वल स्थान अधिक भक्कम केले असून अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी दुसऱ्या, तर झिम्बाब्वेचा सिकंदर रझा तिसऱ्या स्थानावर आहे.

Web Title: Three Indian batsmen came in the top ten, icc world cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.