परिस्थिती सुधारल्यानंतरच स्थानिक क्रिकेटचा विचार - सौरव गांगुली

यंदाच्या सत्राची तारीख निश्चित नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 03:27 IST2020-08-23T03:27:04+5:302020-08-23T03:27:28+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Thought of local cricket only after the situation improves - Sourav Ganguly | परिस्थिती सुधारल्यानंतरच स्थानिक क्रिकेटचा विचार - सौरव गांगुली

परिस्थिती सुधारल्यानंतरच स्थानिक क्रिकेटचा विचार - सौरव गांगुली

नवी दिल्ली : कोरोनामळे सध्या अनिश्चिततेचे वातावरण आहे. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतरच स्थानिक सत्र सुरू करण्याचा विचार करण्यात येईल, असे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सर्व राज्य संघटनांना पाठविलेल्या पत्रात आश्वस्त केले आहे. यंदाचे सत्र कधी सुरू होईल, याची तारीख मात्र त्यांनी सांगितली नाही.

यंदा स्थानिक सत्राची सुरुवात मुश्ताक अली टी-२० स्पर्धेद्वारे नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होण्याची चिन्हे आहेत.
सर्व राज्य सचिवांना पाठविलेल्या पत्रात गांगुली म्हणाले, ‘कोरोनावर मात केल्यानंतर स्थानिक क्रिकेट सुरू करण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये सहभागी होणाºया सर्वांचे आरोग्य हा आमच्या चिंतेचा विषय असेल. परिस्थितीवर बारीक नजर असून स्थानिक क्रिकेट सुरू करण्याआधी सर्वांचे विचार मागविले जातील. पुढील काही दिवसात कोरोनावर मात करून आम्ही स्थानिक क्रिकेटची सुरुवात करू शकतो, असा बीसीसीआयला विश्वास आहे.’ गांगुली यांनी या पत्रात भविष्यातील आंतरराष्टÑीय वेळापत्रकाची (एफटीपी) माहिती दिली. यात भारतीय संघाचा आॅस्ट्रेलिया दौरा आणि पुढच्यावर्षी इंग्लंडचे यजमानपद या दोन मालिका प्रमुख आहेत. याशिवाय २०२१ ला टी-२० विश्वचषक तसेच २०२३ ला देशात एकदिवसीय विश्वचषकाचे आयोजन होणार आहे. २०२१ च्या आयपीएलचे आयोजन एप्रिल महिन्यात करण्यात येणार आहे.

Web Title: Thought of local cricket only after the situation improves - Sourav Ganguly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.