Join us  

...त्यामुळे भारताचा वेगवान मारा बलाढ्य : गांगुली

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितले गुपित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2020 5:14 AM

Open in App

कोलकाता : सांस्कृतिक बदल आणि फिटनेसचा वाढता स्तर यामुळे भारतीय वेगवान गोलंदाजी भक्कम बनली, असे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी म्हटले आहे.युवा जसप्रीत बुमराह आणि अनुभवी ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव तसेच भुवनेश्वर कुमार यांचा वेगवान मारा विश्व क्रिकेटमध्ये सर्वांत बलाढ्य मानला जातो.कसोटी सलामीवीर मयांक अग्रवाल याच्यासोबत बीसीसीआय टिष्ट्वटर हॅन्डलवरील चॅट शोमध्ये बदल होण्यात प्रमुख भूमिका कुणी वठविली, असा प्रश्न गांगुलीला विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले, ‘मी सर्वांचे योगदान महत्त्वपूर्ण मानतो. कोच, फिटनेस, ट्रेनर आणि सांस्कृतिक बदल आदींचे योगदान आहे. आम्ही वेगवान गोलंदाज घडवू शकतो, अशी धारणा बनली. उच्च दर्जाचे फिटनेस राखण्याची परंपरा निर्माण झाल्यामुळे अनेक बदल घडून आले.’जवागल श्रीनाथ, जहीर खान आणि आशिष नेहरा या वेगवान गोलंदाजांचे नेतृत्व करणारे गांगुली म्हणाले, ‘आम्ही वेगवान माऱ्याचे बादशाह बनू शकतो, असा विश्वास आमच्या गोलंदाजांमध्ये संचारला. फिट असल्यास मनसोक्त वेगवान मारा करू शकतो, हे खेळाडूंना कळले आहे.’ अलीकडे इयान बिशप याने भारताच्या वेगवान माºयाचे तोंडभरून कौतुक केले होते. याविषयी मत काय, असे विचारताच गांगुली म्हणाले, ‘माझ्या वेळी विंडीजचे गोलंदाज नैसर्गिकरीत्या बलाढ्य आणि दमदार होते. त्यामुळे आम्ही नैसर्गिक प्रतिभा शोधण्यावर भर दिला. हे सांस्कृतिक बदल सध्या लाभदायी ठरत आहेत.’ (वृत्तसंस्था)याच कार्यक्रमात गांगुली यांनी सचिन नेहमी आपल्याला पहिला चेंडू खेळण्यास कसा भाग पाडायचा, या आठवणीला उजाळा दिला. तुम्ही सचिनसोबत सलामी जोडी असताना सचिन नेहमी पहिला चेंडू तुम्हालाच का खेळायला लावत असे, असे विचारताच दादा म्हणाले, ‘सचिन नेहमी असेच करायचा. त्याचे उत्तरदेखील सचिनकडेच असायचे.

टॅग्स :सौरभ गांगुलीभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय