Join us

आयपीएल आयोजनात होत्या उणिवा

पॅट कमिन्स; भारत क्रिकेटपटूंसाठी चांगला देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 01:08 IST

Open in App
ठळक मुद्देनेमक्या काय उणिवा होत्या, हे मात्र कमिन्सने स्पष्ट केले नाही. काही गोष्टी आणखी उत्कृष्ट करता आल्या असत्या, असे मत मांडून कमिन्स म्हणाला की,‘कोरोनामुळे  आयपीएलचे मागचे सत्र यूएईत यशस्वीरीत्या आयोजित झाले.

आम्ही सुरक्षित आणी मजेत आहोत, याबद्दल स्वत:ला भाग्यवान मानतो. भारतात अनेक जण औषधे आणि ऑक्सिजनसाठी संघर्ष करीत आहेत. आमचे आयपीएलमध्ये  खेळणे योग्य होते का, याचा विचार व्हायला हवा. आयपीएल सामने तीन ते चार तास चाहत्यांचे मनोरंजन करू शकतात, असे अनेकांचे मत होते. मला जे शक्य होते, ते मी केले. भारत हा आम्हा क्रिकेटपटूंसाठी फारच चांगला देश आहे, असे कमिन्सने म्हटले आहे.

मेलबोर्न : ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार व केकेआरचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याने आयपीएल रद्द होण्यास आयोजक स्वत: कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत काही गोष्टींची निश्चित उणीव जाणवल्याचा आरोप केला. 

नेमक्या काय उणिवा होत्या, हे मात्र कमिन्सने स्पष्ट केले नाही. काही गोष्टी आणखी उत्कृष्ट करता आल्या असत्या, असे मत मांडून कमिन्स म्हणाला की,‘कोरोनामुळे  आयपीएलचे मागचे सत्र यूएईत यशस्वीरीत्या आयोजित झाले. यंदा आयोजकांनी भारतातील विविध शहरात आयपीएल आयोजनाचा निर्धार केला. बायो बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव होऊच शकत नाही, असा फाजिल आत्मविश्वास आयोजकांच्या पथ्यावर पडल्याने बायो बबल भेदून अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. मंगळवारी तीव्रता ध्यानात येताच अखेर उर्वरित ३१ सामने अनिश्चित काळासाठी स्थगित झाले. येथे मी ज्या गोष्टी अनुभवल्या ते पाहून काही बाबींकडे आणखी उत्कृष्ट लक्ष देण्याची गरज होती, हे ठाम सांगू शकतो.’’

टॅग्स :आॅस्ट्रेलियाआयपीएल २०२१