Join us

विकेट मिळवल्यावर 'या' गोलंदाजाने केली गळा कापून टाकण्याची कृती; धक्कादायक व्हिडीओ वायरल

हा धक्कादायक प्रकार बऱ्याच जणांनी पाहिला आहे. त्याचबरोबर त्याच्या या सेलिब्रेशनचा व्हिडीओ चांगलाच वायरल झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 21:25 IST

Open in App

मुंबई : एखाद्या गोलंदाजाने बळी मिळवला तर प्रत्येकाच्या सेलिब्रेशनची स्टाइल वेगळीच असते. पण सध्या झालेल्या एका सामन्यात एका गोलंदाजाने थेट गळा कापून टाकण्याची कृती सेलिब्रेशनच्यावेळी करून दाखवली. हा धक्कादायक प्रकार बऱ्याच जणांनी पाहिला आहे. त्याचबरोबर त्याच्या या सेलिब्रेशनचा व्हिडीओ चांगलाच वायरल झाला आहे.

ही धक्कादायक गोष्ट सध्या ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या बिग बॅश लीगमधील आहे. या लीगमध्ये पाकिस्तानचा युवा गोलंदाज खेळत आहे. या वेगवान गोलंदाजाचे नाव हारिस रौफ आहे. आपल्या या धक्कादायक कृतीमधून रौफ हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 

सध्याच्या घडीला रौफकडून चांगली कामगिरी पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्याच्यावर बऱ्याच जणांचे लक्ष आहे. पण आता त्याने जी काही कृती केली आहे, ते पाहता त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

रौफने सिडनी थंडर संघाकडून खेळताना २४ धावांमध्ये तीन विकेट्स मिळवल्या. आतापर्यंत तीन सामन्यांमध्ये रौफने १० विकेट्स पटकावल्या आहेत. रौफने एका सामन्यात विकेट मिळवल्यावर गळा कापून टाकण्याची कृती सेलिब्रेशन करताना केली. पण ही कृती बऱ्याच चाहत्यांना आवडलेली नाही. त्यामुळेच बऱ्याच जणांनी रौफला ट्रोल करायलाही सुरु केलं आहे.

टॅग्स :पाकिस्तानआॅस्ट्रेलिया