Join us  

... तर पाकिस्तानमध्येही सहज निवडणूक जिंकू; भाजपाच्या दिग्गज नेत्यांचे खळबळजनक वक्तव्य

हाराष्ट्रामध्ये भाजपा आणि शिवसेना यांच्यामध्ये युती होणार की नाही, याबाबत संदिग्धता आहे. कारण कोणी किती जागा लढवायच्या यावरून अजूनही वाद-विवाद सुरु आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 7:09 PM

Open in App

मुंबई : सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये निवडणूकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रामध्ये भाजपा आणि शिवसेना यांच्यामध्ये युती होणार की नाही, याबाबत संदिग्धता आहे. कारण कोणी किती जागा लढवायच्या यावरून अजूनही वाद-विवाद सुरु आहेत. पण या निवडणूका तर सोडाच, आम्ही पाकिस्तानमध्येही सहज निवडणूक जिंकू, असे मत भारताच्या एका दिग्गज नेत्यांनी केले होते.

भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक शत्रू आहेत. आतापर्यंत पाकिस्तानने भारपताविरुद्ध बऱ्याच कुरापती केल्या आहेत. भारतानेही त्यांना नेहमीच सडेतोड उत्तर दिले आहे. काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानमध्ये सत्तांतर झाले. पाकिस्तानचे माजी कर्णधार इम्रान खान हे पंतप्रधान झाले. पण अजूनही पाकिस्तानचे नापाक इरादे बदललेले दिसत नाहीत.

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 1999 साली कारगिलचे युद्ध झाले होते. या युद्धात भारताने बाजी मारली होती. त्यानंतर मात्र दोन्ही देशांमध्ये शांततेचे वारे वाहू लागले. भारताचे माजी पंतप्रधान यांनी 2004 साली दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यासाठी क्रिकेटचा मार्ग निवडला. पण क्रिकेटची मालिका खेळवण्यापूर्वी तिथे जाऊन पाहणी करण्याची जबाबदारी संघ व्यवस्थापक रत्नाकर शेट्टी यांच्याकडे देण्यात आली होती. संघाला जाण्यापूर्वी शेट्टी हे स्वत: पाकिस्तानमध्ये जाऊन सुरक्षेची पाहणी करायला गेले होते. यावेळी शेट्टी यांनी एअरपोर्ट, रस्ते, स्टेडियम्स, हॉटेल्स या ठिकाणी जाऊन सुरक्षेची पाहणी केली होती.

पाकिस्तानमध्ये जाऊन आल्यावर त्यांनी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना आपला अहवाल सादर केला. त्यावेळी वाजपेयी यांनी शेट्टी यांना सुरक्षेबाबत विचारणा केली. त्यावर शेट्टी म्हणाले होते की, " पाकिस्तानची जनता या दौऱ्याच्या बातमीने सुखावली आहे. त्यांच्यामध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. एअरपोर्ट, रस्ते आणि बऱ्याच सार्वजनिक ठिकाणांवर आपले (वाजपेयी यांचे) फोटो लावलेले पाहायला मिळाले." ही गोष्ट ऐकल्यावर वाजपेयी म्हणाले की, " आता तर पाकिस्तामध्ये निवडणूक लढवणे सोपे असेल."

टॅग्स :भाजपाअटलबिहारी वाजपेयीपाकिस्ताननिवडणूक