Join us  

...तर आमची निराशा होईल; मार्नस लाबुशेनने व्यक्त केली खंत 

भारतीय क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत आशावादी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2020 12:05 AM

Open in App

सिडनी : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भारतीय संघ आॅस्ट्रेलिया दौºयावर येणार नसेल तर माझ्या आणि माझ्या संघासाठी हे निराशादायी ठरेल, असे आॅस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेन याने म्हटले आहे.

भारताचा आॅस्ट्रेलिया दौरा आॅक्टोबरमध्ये टी२० मालिकेद्वारे सुरू होईल. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेसह डिसेंबरमध्ये दौºयाचा समारोप होणार आहे. कोरोनामुळे हा दौरा होईल की नाही यासंदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही. भारताने दौºयावर यावे यासाठी आॅस्ट्रेलियाने प्रवास निर्बंध शिथिल करण्याची तयारी देखील दाखवली आहे.

आॅनलाईन पत्रकार परिषदेत बोलताना लाबुशेन म्हणाला, ‘भारतीय संघ दौºयावर न आल्यास आम्ही क्रिकेट खेळू शकणार नाही. माझ्यासह सर्व सहकारी आणि क्रिकेट आॅस्ट्रेलियासाठी हे निराशादायी ठरेल.’ भारतीय दौºयासोबतच आॅस्ट्रेलियात १८ आॅक्टोबरपासून सुरू होणाºया टी२० विश्वचषकावरदेखील गडद संकट कायम आहे. आॅस्ट्रेलियात सर्वात कमी ६८०० कोरोनाबाधित असून १०० जणांचा मृत्यू झाला आहे. लाबुशेनने याचे श्रेय आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले.

तो म्हणाला, ‘कोरोनाला आळा घालण्यासाठी आमच्या आरोग्य यंत्रणेने केलेले काम अभिनंदनीय आहे. यामुळे आम्ही भारतीय संघाची उत्तम व्यवस्था करू शकू. भारतीय संघ येथे चार महिन्यानंतर येऊ शकतो. वेगवान बदल होत असल्यामुळे अंदाज वर्तविणे कठीण होत आहे. लवकरच सर्व व्यवस्थित होईल, अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही.’ वन डेत दीर्घ खेळीची इच्छा‘एकदिवसीय क्रिकेटमध्ये दीर्घ खेळी करणे, माझे लक्ष्य आहे. अखेरच्या काही षटकात धडाकेबाज फलंदाजी करण्यासाठी सुधारणा करीत आहे. याशिवाय गोलंदाजीतही बरीच सुधारणा घडवून आणावी लागेल. माझ्यादृष्टीने मैदान आणि मैदानाबाहेर अनेक गोष्टींमध्ये सुधारणा शक्य असून त्यात मला दिवसागणिक यश येत आहे, ही समाधानकारक बाब म्हणावी लागेल.’ - मार्नस लाबुशेन

टॅग्स :भारतआॅस्ट्रेलिया