Join us  

T20 World Cup 2021 चं Anthem Song प्रदर्शित! कोहली, पोलार्ड, राशीद अन् मॅक्सवेलचा नवा अवतार; पाहा व्हिडिओ...

T20 World Cup 2021: टी-२० वर्ल्डकपचं थीम साँग भारतीय संगीतकार अमित त्रिवेदी यांनी संगीतबद्ध केलं आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 5:09 PM

Open in App

T20 World Cup 2021: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२१ स्पर्धेला आता महिन्याभरापेक्षाही कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. संयुक्त अरब अमिरात (UAE) आणि ओमानमध्ये (Oman) स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे. १७ ऑक्टोबरपासून सुरू होणारी ही आंतरराष्ट्रीय वर्ल्डकप स्पर्धा १४ नोव्हेंबरपर्यंत रंगणार आहे. सर्व आंतरराष्ट्रीय संघ यासाठी जोरदार तयारी करत आहेत. तर काही खेळाडू आयपीएलमध्ये कामगिरी उंचावून स्पर्धेसाठीची रंगीत तालीम करत आहेत. आयसीसीकडून टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठीची जोरदार तयारी सुरू आहे. यात आयसीसीकडून आज टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठीचं खास गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. (Theme song of icc t20 world cup launched name live the game composed by amit trivedi)

टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी आयसीसीनं Anthem Song तयार केलं असून Live The Game असं या गाण्याचे बोल आहेत. आयसीसीच्या ट्विटर हँडलवरुन या गाण्याचा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे गाणं भारतीय संगीतकार अमित त्रिवेदी यांनी संगीतबद्ध केलं आहे. 

गाण्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशीद खान, वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्ड आणि ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल यांचा एनिमेटेड अवतार पाहायला मिळतो. याशिवाय गाण्यात युवा प्रेक्षकांशी नाळ जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यासाठी तरुणाईचंही अ‍ॅनिमेशन करण्यात आलं आहे. आपल्या आवडत्या खेळाडूंसोबत स्टेडियममध्ये खेळण्याची संधी युवांना मिळालीय असं या अ‍ॅनिमेशनमध्ये दाखवण्यात आलं आहे. 

2D आणि 3D इफेक्टचा वापरटी-२० वर्ल्डकपचं गाणं मग ते जागतिक पातळीच झालंच पाहिजे या उद्देशातून अवतार अ‍ॅनिमेशननं ब्रँड न्यू ब्रॉडकास्ट टेक्नोलॉजीचा वापर केला आहे. यात 2D आणि 3D इफेक्ट्सचा वापर करण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे अ‍ॅनिमेशन तयार करण्यासाठी जवळपास ४० जणांची टीम यावर काम करत होती. यात डिझायनर, मॉडलर्स, मॅट पेंटर्स, एनिमेटर्स, लायटर्स, कम्पोसिटर्स यांचा समावेश होता. क्रिकेटपटूंनी हे गाणं पाहिल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. 

टॅग्स :टी-20 क्रिकेटट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१भारतआयपीएल २०२१
Open in App