IPL 2025 CSK vs SRH Ravindra Jadeja Caught Cheating : चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर रंगलेल्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरताच चेन्नई सुपर किंग्जचा स्टार स्टार रवींद्र जडेजाची चोरी पकडली गेली. एकही चेंडू न खेळता त्याच्यावर बॅट बदलण्याची वेळ आली. यंदाच्या हंगामात मैदानातील पंचांना बॅट तपासण्याचे अधिकार दिले आहेत. जड्डू अधिक जाड बॅट घेऊन मैदानात उतरला होता. तो मैदानात आल्यावर लगेच पंचांनी गेज काढले अन् जड्डूची चोरी पकडली गेली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
.. मैदानात उतरताच पकडली गेली चोरी
चेन्नई सुपर किंग्जच्या डावातील पाचव्या षटकात सॅम कुरेन याची विकेट पडल्यावर रवींद्र जडेजा फलंदाजीसाठी मैदानात उतरला. स्ट्राइक घेण्याआधीच पंचांनी गेज काढत त्याची बॅट तपासली. अन् त्याची बॅट नियमाला धरून नाही, ते सिद्ध झाले. ही बॅटरनं केलेली एक प्रकारची चोरीच आहे. जड्डूची ही चोरी मैदानात उतरल्या उतरल्या पकडली गेली. आयसीसीच्या नियमानुसार, बॅटचा आकार किती असावा ते ठरलेले आहे. ते तपासण्यासाठी पंच आपल्यासोबत गेज (बॅट तपासणी करण्याचे उपकरण) ठेवत आहेत. जर बॅट गेजमधून जात नसेल तर फलंदाजाने ती ताबडतोब बदलणे आवश्यक आहे. जड्डूची बॅट गेज चाचणीत फेल ठरली अन् त्याला बॅट बदलावी लागली.
रोहित ते KL राहुल! IPL मध्ये सर्वाधिक 'सिक्सर' मारणारे आघाडीचे ५ भारतीय फलंदाज
काय सांगतो बॅटसंदर्भातील नियम?
आयसीसीच्या नियमानुसार, बॅटची जाडी ४.२५ इंच (१०.७९ सेंमी), मधल्या भागाची जाडी २.६४ इंच (६.७ सेंमी) तर काठाची जाडी १.५६ इंच (चार सेंमी) हून अधिक असू नये. बॅटची लांबी ३८ इंच (९६.४ सेंमी) हून अधिक असूनही चालत नाही. हेच तपासण्यासाठी मैदानातील पंच 'बॅट गेज' उपकरणाच्या माध्यमातून फलंदाजांची बॅट तपासताना दिसत आहे. जड्डूची बॅट या चाचणीत फेल ठरली आणि त्याच्यावर बॅट बदलण्याची वेळ आली आहे.