Join us  

...तर भारतीय संघाचे डब्ल्यूटीसी फायनलचे तिकीट पक्के !

उर्वरित सामन्यांपैकी किमान अर्धे कसोटी सामने जिंकावे लागतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 9:55 AM

Open in App

नवी दिल्ली : डब्ल्यूटीसी २०२३-२५ मध्ये भारतीय संघ अजूनही अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या आणि न्यूझीलंड तिसऱ्या स्थानावर पोहोचला. पहिली फायनल भारत-न्यूझीलंड यांच्यात, तर दुसरी फायनल भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात झाली, दोन्ही वेळा भारताला पराभवाचा फटका बसला होता. आगामी सत्रातही भारत फायनलचा दावेदार आहे. त्यासाठी उर्वरित सामन्यांपैकी किमान अर्धे कसोटी सामने जिंकावे लागतील.

भारताने इंग्लंडविरुद्ध मालिका ४-१ नै, तर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्धची मालिका २-० अशी जिंकली. भारताला आता सप्टेंबरमध्ये घरच्या मैदानावर दोन सामन्यांची मालिका खेळायची असून त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका होईल. या पाच सामन्यांशिवाय भारतीय संघ डिसेंबरमध्ये पाच सामन्यांची मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. याचा अर्थ भारताचे दहा सामने शिल्लक आहेत. भारतात पाच सामने जिंकल्यास आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध किमान एक विजय साजरा केल्यास भारताचे स्थान डब्ल्यूटीसी फायनलसाठी पक्के होणार आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाला मात्र कमकुवत लेखता येणार नाही.

ऑस्ट्रेलिया दुसन्या स्थानी

न्यूझीलंडविरुद्धची दोन कसोटी सामन्यांची मालिका २-० अशी जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने जागतिक कसोटी अजिक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेच्या गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले. या विजयासह ऑस्ट्रेलियाला १२ गुण मिळाले असून, त्याची विजयी टक्केवारी ६२.५० अशी झाली आहे. न्यूझीलंडची टक्केवारी ५० इतकी झाली असून, त्यांची तिसन्या स्थानी घसरण झाली आहे. भारतीय संघाने ६८.५१ टक्केवारीसह अव्वल स्थानी कब्जा केला आहे. भारताने नऊ कसोटीपैकी सहा सामने जिंकले आहेत, ऑस्ट्रेलियाने खाइस्टचर्च येथे दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडला तीन गड्यांनी नमवले. त्याआधी ऑस्ट्रेलियाने वैलिग्टन येथे न्यूझीलंडला १७२ धावांनी नमवले होते.

 

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारतीय क्रिकेट संघ