Join us  

वर्ल्ड कप २०२४ चे वेळापत्रक जाहीर; भारतीय संघाला अ गटात स्थान, जाणून घ्या वेळ, ठिकाण

The schedule for the 2024 ICC U19 Men’s Cricket World Cup - दक्षिण आफ्रिकेत पुढल्या वर्षी होणाऱ्या १९ वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 5:13 PM

Open in App

The schedule for the 2024 ICC U19 Men’s Cricket World Cup - दक्षिण आफ्रिकेत पुढल्या वर्षी होणाऱ्या १९ वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. पाच वेळच्या विजेत्या भारताचा पहिला सामना २०२०च्या विजेत्या बांगलादेशविरुद्ध ब्लोएमफोंटेन येथे होणार आहे, तर यजमान दक्षिण आफ्रिका सलामीच्या लढतीत वेस्ट इंडिजचा सामना करणार आहे.  १६ संघाचा समावेश असलेल्या या स्पर्धेतील ४१ सामने ५ वेगवेगळ्या मैदानांवर खेळवण्यात येणार आहे.

 भारतीय संघाला अ गटात बांगलादेश, आयर्लंड व अमेरिका यांचा सामना करायचा आहे. ब गटात इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज व स्कॉटलंड; क गटात ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे व नामिबाया, तर ड गटात

अफगाणिस्तान, पाकिस्तान, न्यूझीलंड व नेपाळ यांचा समावेश आहे. प्रत्येक गटातील अव्वल ३ संघ सुपर सिक्स मध्ये खेळतील, त्यानंतर उपांत्य फेरी व फायनल होईल. 

 

१९९८ व २०२० नंतर दक्षिण आफ्रिकेत तिसऱ्यांदा १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. सर्व संघ १३ ते १७ जानेवारी या कालावधीत प्रत्येकी दोन सराव सामने खेळतील.  

भारताचे सामने २० जानेवारी - वि. बांगलादेश२५ जानेवारी - वि. आयर्लंड२८ जानेवारी - वि. अमेरिका 

टॅग्स :19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कपभारतीय क्रिकेट संघआयसीसी