Join us

PSL मधील मुलतान सुलतान संघाच्या मालकाची आत्महत्या

डेव्हिड मिलर, रिली रोसोवू, शान मसूद, वेन पार्नेल, टीम डेव्हिड, कार्लोस ब्रेथवेट, मोहम्मद रिझवान या आंतरराष्ट्रीय स्टार्सची फौज या संघाकडे आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 14:28 IST

Open in App

पाकिस्तान सुपर लीगमधील ( PSL) मुलताना सुलतान संघाचे मालक आलमगिर खान तरीन (Alamgir Khan Tareen) यांनी आत्महत्या केली. स्थानिक मीडियाच्या वृत्तानुसार आलमगिर यांनी स्वतःच्याच पिस्तुलातून डोक्यावर गोळी घातली. त्यांच्या आत्महत्येमागचं कारण अद्याप समजलेलं नाही. मुलतान सुलतान संघाचे सीईओ हैदर अझर यांनी आलमगिर यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. लाहोर पोलिस याचा तपास करत आहे आणि त्यांनी ही आत्महत्या असल्याचे सांगितले आहे.

२०१७ मध्ये मुलतान सुलतान संघ तयार झाला. पण, पदार्पणाच्या हंगामात त्यांना काही खास करता आले नाही. लीगची वार्षिक फी भरू न शकल्याने या फ्रँचायझीसोबतचा करार मोडला गेला होता. डिसेंबर २०१८मध्ये आलमगिर आणि अली खान तारीन हे या फ्रँचायझीचे नवे मालक बनले.  २०२१ मध्ये आलमगिर यांनी फ्रँचायझीचे सर्व शेअर आपल्या ताब्यात घेतले होते आणि त्याच वर्षी  संघाने PSL जेतेपद जिंकले होते.  डेव्हिड मिलर, रिली रोसोवू, शान मसूद, वेन पार्नेल, टीम डेव्हिड, कार्लोस ब्रेथवेट, मोहम्मद रिझवान या आंतरराष्ट्रीय स्टार्सची फौज या संघाकडे आहे. 

 

टॅग्स :पाकिस्तानटी-20 क्रिकेट
Open in App