The Legends League Cricket (LLC) Masters - भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी ( Gautam Ghambhir Vs Shahid Afridi) हे मैदानावरील 'कट्टर वैरी' आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही या दोघांमध्ये अनेक चर्चासत्रांमध्ये शाब्दिक वाद झालेले पाहायला मिळाले आहेत. पण, दोघंही पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर समोरासमोर येणार आहेत. लिजेंड्स लीग क्रिकेट (LLC) मास्टर्स स्पर्धा दोहा येथील एशियन टाऊन क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या लीगमध्ये एकूण ३ संघ सहभागी होत आहेत. ही ट्वेंटी-२० लीग ११ दिवसांसाठी आयोजित केली जाणार आहे. ज्यामध्ये जगभरातील निवृत्त खेळाडू आपले कौशल्य दाखवताना दिसतील.
इंडिया महाराजा संघाचे नेतृत्व गौतम गंभीर करेल तर आशिया लायन्सचे नेतृत्व शाहिद आफ्रिदी करेल. वर्ल्ड एकादश संघाचे नेतृत्व आरोन फिंच करणार आहे. लीगचा पहिला सामना शुक्रवारी ( १० मार्च) इंडिया महाराजा आणि एशिया लायन्स यांच्यात होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८.00 वाजता खेळला जाईल. या सामन्यात गंभीर आणि आफ्रिदी आमनेसामने येणार आहेत. गंभीर आणि आफ्रिदी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही सोशल मीडियावर एकमेकांशी भिडताना दिसतात.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"