Join us

IPL मधील तळातील २ संघांना हद्दपार करा, अन्य लीगमधील अव्वल दोन संघांना संधी द्या! 

इंडियन प्रीमिअर लीगच्या हंगमाच्या शेवटी गुणतालिकेत तळाला राहणाऱ्या संघांना पुढील हंगामात खेळण्याची संधी न देता....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 17:12 IST

Open in App

IPL 2024 Point Table : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ साठीच्या लिलावापूर्वी फ्रँचायझींनी ८ खेळाडूंना रिटेन ठेवता यावे अशी विनंती वजा मागणी बीसीसीआयकडे केली आहे. त्यामुळे फ्रँचायझींनी गेल्या काही वर्षांत तयार केलेला संघ पूर्णपणे विस्कळीत होणार नाही आणि हवे असतील तेवढेच खेळाडू संघात घेता येतील. त्यात आता एक नवीन मागणी समोर येत आहे... इंडियन प्रीमिअर लीगच्या हंगमाच्या शेवटी गुणतालिकेत तळाला राहणाऱ्या संघांना पुढील हंगामात खेळण्याची संधी न देता दुसऱ्या लीगमधील अव्वल दोन संघांना संधी द्यावी, असा मुद्दा उपस्थित केला गेला आहे. 

आयपीएल २०२४ मध्ये आतापर्यंत कोलकाता नाईट रायडर्स, लखनौ सुपर जायंट्स व मुंबई इंडियन्स यांचे प्रत्येकी ४ सामने झालेले आहेत. बाकी संघ किमान ५ किंवा त्याहून अधिक सामने खेळले आहेत. राजस्थान रॉयल्स ५ सामन्यांत ८ गुणांसह टेबल टॉपर आहेत. KKR व LSG यांनी ४पैकी ३ सामने जिंकून अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान टिकवले आहे. CSK ( ५ सामने ) , SRH ( ५) व GT ( ६) यांनीही ३ विजयासह खात्यात ६ गुण जमा केल आहेत, परंतु त्यांनी कोलकाता व लखनौ यांच्यापेक्षा जास्त सामने खेळले आहेत. पंजाब किंग्स ५ पैकी २ सामने जिंकून ४ गुण असलेला एकमेव संघ तालिकेत आहे. MI, RCB व DC यांना एकच विजय मिळवता आला आहे, परंतु मुंबईने ( ४) या दोन्ही संघापेक्षा एक सामना कमी खेळला आहे. 

सध्या गुणतालिकेत चुरस दिसत असताना Iceland Cricket ने ट्विट केलं आहे. ''इंडियन प्रीमियर लीग आणखी रोमांचक होईल जर प्रत्येक वर्षी गुणतालिकेतील खालच्या दोन फ्रँचायझींना हद्दपार केले गेले आणि त्यांच्या जागी नवीन लीग B मधील अव्वल दोन फ्रँचायझी संघांना स्थान दिले. चर्चा करा...,''असे ट्विट त्यांनी केले आहे. तुम्हाला काय वाटतं?

टॅग्स :आयपीएल २०२४टी-20 क्रिकेट