Join us  

पुढच्या वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर; भारताच्या सामन्याच्या तारखा नोट करा

पुढल्या वर्षी होणाऱ्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले. १३ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत श्रीलंकेत ही स्पर्धा पार पडणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 2:51 PM

Open in App

पुढल्या वर्षी होणाऱ्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले. १३ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत श्रीलंकेत ही स्पर्धा पार पडणार आहे.  १६ संघांचा समावेश या वर्ल्ड कप स्पर्धेत करण्यात आल्याने काही नवीन ट्विस्ट अँड टर्न पाहायला मिळणार आहेत. २००६ नंतर प्रथमच श्रीलंकेत वर्ल्ड कप स्पर्धा होतेय आणि १३ जानेवारीला झिम्बाब्वेविरुद्ध पहिला सामना यजमान खेळतील. 

भारताने २०२२ चा वर्ल्ड कप उंचावला होता आणि त्यांना या स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध पहिली लढत खेळायची आहे.  १६ संघाची ४ गटांत विभागणी करण्यात आली आहे आणि प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ पुढच्या फेरीत जातील आणि त्यानंतर सुपर सिक्स फेरी होईल. १३ ते २१ जानेवारी या कालावधीत गट फेरी होईल. १६ पैकी १२ संघ पुढल्या फेरीत जातील आणि त्यांची दोन गटांत विभगाणी होईल. अ व ड गटातील अव्वल तीन संघ एका गटात आणि ब व क गटातील तीन संघ एका गटात असतील.  सुपर सिक्समध्ये प्रत्येक संघ दोन सामने खेळतील.

थेट पात्र ठरलेले संघ - श्रीलंका, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, आयर्लंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे.  

टॅग्स :19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध बांगलादेशआयसीसी