Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारत-न्यूझीलंड यांच्यात आज रंगणार पाचवा टी-२० सामना, संजूचा फॉर्म, अक्षरच्या फिटनेसकडे लक्ष, गोलंदाजीत फेरबदल शक्य

Ind Vs NZ 5th T20I : जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जाणारा भारतीय संघ टी-२० विश्वचषकाआधी शनिवारी पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध भिडणार आहे. सलामीवीर संजू सॅमसन स्थानिक चाहत्यांपुढे कसा खेळतो, याकडे लक्ष असेलच; शिवाय अष्टपैलू अक्षर पटेल फिटनेस चाचणीत यशस्वी ठरेल का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 11:49 IST

Open in App

तिरुवनंतपुरम -  जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जाणारा भारतीय संघ टी-२० विश्वचषकाआधी शनिवारी पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध भिडणार आहे. सलामीवीर संजू सॅमसन स्थानिक चाहत्यांपुढे कसा खेळतो, याकडे लक्ष असेलच; शिवाय अष्टपैलू अक्षर पटेल फिटनेस चाचणीत यशस्वी ठरेल का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

विशाखापट्टणमच्या चौथ्या सामन्यात भारत सहजपणे पराभूत झाला. या सामन्यात ५ गोलंदाजांचा प्रयोग झाला. त्याच वेळी अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांनी गोलंदाजी केली नव्हती. भारताने आधीच मालिका जिंकल्यामुळे निकालाचा फारसा परिणाम झाला नाही. पण, पाचव्या सामन्यात भारतीय संघ गोलंदाजीत पुन्हा फेरबदल करण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

वरुण चक्रवर्तीला संधी१. संघ व्यवस्थापन मागच्या दोन सामन्यांत बाहेर बसलेल्या वरुण चक्रवर्तीला संधी देऊ शकेल. फलंदाजीत अधिक बदल होणार नाहीत. पण, संजू सॅमसनच्या कामगिरीकडे लक्ष असेल.२. या मालिकेत संजू धावांसाठी झगडत आहे. त्याची तांत्रिक कमजोरी हा चिंतेचा विषय आहे. लवकर बाद होत असल्याने त्याचा आत्मविश्वासही डळमळीत झाला.३. तो आपल्या मैदानावर पुन्हा लय मिळविण्याचा प्रयत्न करणार आहे. तो स्थानिक स्टार असल्याने विमानतळावर खेळाडूंचे आगमन झाले त्यावेळी असंख्य चाहते रांगेत संजूच्या स्वागतासाठी उपस्थित होते.

४-१ ने विजयाची तयारीभारत या लढतीला औपचारिक मानणार नाही. सामना जिंकून ४-१ ने मालिका खिशात घालण्यासह मुंबईत ७ फेब्रुवारी रोजी टी-२० विश्वचषकाचा पहिला सामना खेळण्याचा निर्धार संघ व्यवस्थापनाने व्यक्त केला. पाहुणा न्यूझीलंड भारताच्या आक्रमकतेपुढे पहिल्या तीन सामन्यांत असहाय जाणवला. विशाखापट्टणममध्ये मात्र त्यांनी भारताच्या प्रमुख फलंदाजांवर वचक राखला. भारताला नमवू शकतो, याची त्यांना खात्री पटली. ३-२ असा मालिकेचा निकाल राखून विश्वचषकाला सामोरे जाण्यासाठी त्यांनीही कंबर कसली असेल.

धावांचा पाऊस पडणार...येथील ग्रीनफिल्ड स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणावर धावा निघतात. भारताने येथे झालेल्या चारपैकी ३ टी-२० सामन्यांत विजय मिळविले आहेत. त्यात २०१७ ला न्यूझीलंडविरुद्ध जिंकलेल्या सामन्याचादेखील समावेश आहे. भारताला नमविण्यासाठी नेमके काय करण्याची गरज आहे, हे न्यूझीलंडला कळले असल्याचे प्रतिस्पर्धी कर्णधार मिचेल सँटनरने सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : India vs New Zealand: Focus on Sanju, Axar in final T20

Web Summary : India faces New Zealand in the final T20. Focus is on Sanju Samson's form and Axar Patel's fitness. Changes in bowling are likely as India aims for a 4-1 series win before the World Cup.
टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडटी-20 क्रिकेट