Join us

Asia Cup : पाकिस्तानच्या विरोधात आणखी एक देश उभा राहिला, BCCIला पाठींबा दिला

आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानमध्ये होणार आहे, परंतु दोन राष्ट्रांमधील राजकीय तणावामुळे भारताने या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 17:56 IST

Open in App

आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानमध्ये होणार आहे, परंतु दोन राष्ट्रांमधील राजकीय तणावामुळे भारताने या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला आहे.या समस्येचे निराकरण करण्यासाठी, पाकिस्तानने आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत एक प्रस्ताव ठेवला होता. ज्यामध्ये भारत वगळता सर्व संघ पाकिस्तानमध्ये खेळतील,  आणि भारताचे सामने तटस्थ ठिकाणी होतील.  मात्र, भारतानेही हा प्रस्ताव फेटाळून लावला असून आता संपूर्ण स्पर्धा तटस्थ ठिकाणी व्हावी यासाठी जोर धरला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीसीबीने हायब्रीड मॉडेलबाबत आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यास आशिया चषक यंदा होऊ शकणार नाही आणि पीसीबी त्यासाठी तयार आहे. "एसीसीच्या अध्यक्षांनी कार्यकारी मंडळाची बैठक बोलावल्यानंतर आशिया चषक रद्द झाला तर त्याचे परिणाम केवळ पाकिस्तानच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील सहभागावर होणार नाहीत तर पीसीबीच्या फ्युचर टूअरमधील श्रीलंका, अफगाणिस्तान किंवा बांगलादेश यांच्याशी असलेल्या द्विपक्षीय संबंधांवर देखील होतील," एसीसीच्या एका सूत्राने सांगितले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) आशिया चषक पूर्णपणे वेगळ्या देशात आयोजित करण्याची कल्पना नाकारली आहे. श्रीलंका आणि बांगलादेशच्या क्रिकेट मंडळांनी तटस्थ ठिकाणी स्पर्धा आयोजित करण्यासाठी पाकिस्तानचे मन वळवण्याचा अनौपचारिक प्रयत्न केला, परंतु त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला.

सूत्रांनी पुढे सांगितले की तटस्थ ठिकाणी स्पर्धेचे आयोजन करण्याबाबत एसीसी सदस्यांमधील अनौपचारिक चर्चेदरम्यान, श्रीलंका क्रिकेट (एसएलसी) ने बीसीसीआयच्या प्रस्तावाला पाठिंबा दिल्याचे उघड झाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :एशिया कप 2022भारत विरुद्ध पाकिस्तानश्रीलंका
Open in App