इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गॅबा येथे सुरू असलेल्या डे-नाईट दुसऱ्या ॲशेस कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचा स्टार खेळाडू जो रूट याने शतक झळकावले. रूटचे कसोटीतील हे ४० वे शतक ठरले. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियन भूमीवरील हे त्याचे पहिलेच शतक ठरले. रूटचे हे शतक केवळ इंग्लंड संघासाठीच नव्हे, तर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन याच्यासाठीही संजीवनी ठरले.
२०२५-२६ च्या ॲशेस मालिकेच्या सुरुवातीपूर्वी हेडनने एक अत्यंत धाडसी विधान केले होते. "जर इंग्लंडचा कर्णधार जो रूटने संपूर्ण ॲशेस कसोटी मालिकेत एकही शतक झळकावले नाही, तर मी मेलबर्न क्रिकेट ग्राउंड ओलांडून नग्न धावेल", अशी पैज लावली होती. पर्थमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडचा संघ अवघ्या दोन दिवसांत कोसळला आणि रूट ० आणि ८ धावांवर बाद झाला. त्यानंतर हेडनला नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केले.
मॅथ्यू हेडनचा व्हिडीओ समोर
दरम्यान, दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी रूटने शतक झळकावले. त्यामुळे हेडनने पैज जिंकली आहे. क्रिकेट इंग्लंडने हेडनला रूटच्या शतकाबद्दल अभिनंदन करतानाचा एक व्हिडिओ देखील शेअर केला, ज्यामध्ये हेडन खूप आनंदी दिसत आहे.
राजस्थान रॉयल्सचा हेडनला टोला
रूटच्या या शतकानंतर आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सनेही या संपूर्ण प्रकरणावर एक मजेदार पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये राजस्थान रॉयल्सने म्हटले आहे की, "आम्ही आनंदी आहोत, पण आमच्यापेक्षा दुसरा कोणीतरी आनंदी आहे", असे त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले. रूटच्या या शतकी खेळीमुळे केवळ हेडनलाच दिलासा मिळाला नाही, तर पहिल्या कसोटीतील मानहानिकारक पराभवानंतर इंग्लंडने दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करण्याची चांगली संधी निर्माण केली आहे.
Web Summary : Matthew Hayden avoided a naked run after Joe Root's century. Hayden had vowed to run naked if Root didn't score a century in the Ashes series. Root's ton brought relief to Hayden and gave England a chance to recover in the second test.
Web Summary : जो रूट के शतक के बाद मैथ्यू हेडन ने राहत की सांस ली। हेडन ने कसम खाई थी कि अगर रूट एशेज श्रृंखला में शतक नहीं बनाते हैं तो वह नग्न दौड़ेंगे। रूट के शतक ने हेडन को राहत दी और इंग्लैंड को दूसरे टेस्ट में वापसी करने का मौका दिया।