Join us  

Emotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video

या ब्लेझरशी एक भावनिक नातं असल्याचं गांगुलीनं सांगितलं आणि ते एकून तुम्हालाही दादाचा अभिमान वाटेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 4:48 PM

Open in App

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यानं आज अधिकृतरित्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( बीसीसीआय) अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली. गांगुलीच्या रुपानं 65 वर्षांनंतर बीसीसीआयच्या अध्यक्षपदी भारतीय संघाचा कर्णधार विराजमान झाला आहे. गांगुलीच्या नियुक्तीनं भारतीय क्रिकेटला अच्छेदिन येतील अशी सर्वांना अपेक्षा आहे आणि दहा महिन्यांच्या कार्यकाळात गांगुलीकडून त्यादृष्टीनं धाडसी निर्णयाची उत्सुकता आहे. बीसीसीआयचे अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताना गांगुलीनं पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला होता, परंतु पत्रकार परिषदेत तो एक ब्लेझर घालून आला. या ब्लेझरशी एक भावनिक नातं असल्याचं गांगुलीनं सांगितलं आणि ते एकून तुम्हालाही दादाचा अभिमान वाटेल.

भारतीय क्रिकेटच्या यशासाठी जे काही करावं लागेल, त्यासाठी कोहलीला संपूर्ण सहकार्य करणार, असे मत गांगुलीनं व्यक्त केलं. तो म्हणाला,'' भारतीय क्रिकेटमधील कोहली हा सर्वात महत्त्वाचा माणूस आहे. त्याच्यासोबत मी चर्चा केली आहे. भारतीय संघाला जगात सर्वोत्तम बनवण्यासाठी आम्ही कोहलीला सर्वतोपरी सहकार्य करू. कोहलीनं वर्ल्ड कप जिंकलेला नाही, हे जरी खरं असलं तरी प्रत्येकवेळी यश मिळतेच असं नाही. भारतीय क्रिकेटची वाटचाल योग्य दिशेनं सुरू राहिल याची आम्ही काळजी घेणार आहोत. यासाठी कोहलीसोबत बसून चर्चा करणार आहोत आणि त्याला काय हवे ते पाहणार आहोत.'' कर्णधार असताना बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनीही  आपल्याला काहीच कमी पडू दिले नाही, असं गांगुलीनं सांगितले. असेच नाते महेंद्रसिंग धोनी आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन यांच्यात होते. कोहलीसोबतही तसंच नातं निर्माण करण्याचा निर्धार गांगुलीनं बोलून दाखवला. पण, ज्यावेळी त्याला ब्लेझरबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तो थोडा भावनिक झाला. तो म्हणाला,''हा ब्लेझर मला मी भारतीय संघाचा कर्णधार झालो तेव्हा मिळाला होता आणि त्यामुळे आजच्या दिवशी तो पुन्हा घालण्याचा मी ठरवलं होतं. पण, हा ब्लेझर आता सैल झाला आहे.'' 

पाहा व्हिडीओ...

टॅग्स :सौरभ गांगुलीबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ