टीम इंडियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडच्या संघाने दोन दिवस आधीच आपली प्लेइंग इलेव्हन पक्की केली आहे. भारतीय संघ कसा असेल याचे चित्र मात्र नाणेफेकीनंतरच स्पष्ट होईल. २ जुलै पासून बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टनच्या मैदानात रंगणाऱ्या सामन्याआधी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स यानेही प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याला जसप्रीत बुमराहसंदर्भातील प्रश्न विचारण्यात आल्याचे पाहायला मिळाले. त्यावर बेन स्टोक्सनं दिलेला रिप्लाय चर्चेचा विषय ठरतोय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम, नेमकं काय म्हणाला बेन स्टोक्स?
इंग्लंड दौऱ्यावर जसप्रीत बुमराहच्या वर्कलोडचा मुद्दा चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय. एका बाजूला शुबमन गिलनं जसप्रीत बुमराहसंदर्भात कोड्यात उत्तर दिल्यावर दुसऱ्या बाजूला इंग्लंडच्या कर्णधारालाही जसप्रीत बुमराहच्या खेळण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बेन स्टोक्सनं "तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम आहे अन् मी इंग्लंडचा कर्णधार आहे, असे म्हणत विषयच संपवला.
IND vs ENG: जसप्रीत बुमराहला बाहेर बसवा, 'या' गोलंदाजाला संघात घ्या; अनुभवी ग्रेग चॅपल यांचा सल्ला
टीम इंडियाविरुद्ध खेळताना अधिक दबाव
टीम इंडिया विरुद्ध खेळताना इतर संघाच्या तुलनेत अधिक दबाव असतो, ही गोष्टही बेन स्टोक्सनं बोलून दाखवली. मागच्या सामन्यात जे काही झालं ते बाजूला ठेवून आता नव्या सामन्यात नव्याने सुरुवात करावी लागेल, असेही तो म्हणाला. लीड्सच्या हेडिंग्लेच्या मैदानात इंग्लंडच्या संघाने टीम इंडियाविरुद्ध दुसऱ्यांदा ३५० पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करून दाखवला होता. त्यामुळे संघाचा आत्मविश्वास उंचवला आहे, असेही त्याने सांगितले.
पंतसंदर्भातही केलं मोठ वक्तव्य
दुसऱ्या कसोटी सामन्याआधी बेन स्टोक्स याने रिषभ पंतसंदर्भातही मोठं वक्तव्य केलं आहे. रिषभ पंत हा प्रतिस्पर्धी संघात असला तरी त्याची बॅटिंग खूप आवडते. तो क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात एका स्टाईलमध्ये खेळतो. तुम्ही ज्यावेळी बिनधास्त खेळता त्यावेळी त्याचा रिझल्टही चांगला मिळतो. जे आपण पहिल्या कसोटी सामन्यात पाहिले, असे म्हणत स्टोक्सनं पंतवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. हेडिंग्ले कसोटी सामन्यात रिषभ पंत याने दोन्ही डावात शतकी खेळी केली होती.