विराट कोहली कौंटी खेळला नाही तेच चांगलं - गांगुली

कोहली कौंटी खेळला नाही, हे चांगलेच झाले, असे मत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2018 21:02 IST2018-06-24T21:02:31+5:302018-06-24T21:02:53+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
That's the best that Virat Kohli did not play county cricket - Ganguly | विराट कोहली कौंटी खेळला नाही तेच चांगलं - गांगुली

विराट कोहली कौंटी खेळला नाही तेच चांगलं - गांगुली

ठळक मुद्देकोहलीला 10 डावांमध्ये फक्त 134 धावाच करता आल्या होत्या.

नवी दिल्ली : इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीला कौंटी क्रिकेट खेळायचे होते. पण दुखापतीमुळे त्याला सरे या संघाकडून क्रिकेट खेळता आले नाही. पण कोहली कौंटी खेळला नाही, हे चांगलेच झाले, असे मत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केले आहे.

भारतीय संघ 2014 साली इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला होता. तेव्हा कोहलीला चांगली कामगिरी करता आली नव्हती. कोहलीला 10 डावांमध्ये फक्त 134 धावाच करता आल्या होत्या. त्यामुळे यावेळी इंग्लंडच्या दौऱ्याला सुरुवात होण्यापूर्वी कौंटी क्रिकेट खेळावे असे कोहलीला वाटले होते. पण दुखापतीमुळे तो कौंटी खेळी शकला नाही.

गांगुली म्हणाला की, " कोहली कौंटी क्रिकेट खेळला नाही ते एका अर्थाने बरेच झाले. कोहली गेल्यावेळी जेव्ही इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला होता, तेव्हा त्याला चांगली कामगिरी करता आली नव्हती. पण यावेळी मात्र कोहली चांगल्या फॉर्मात आहे. त्याच्याकडून चांगल्या धावाही होत आहे. त्यामुळे कौंटी न खेळताच कोहली या दौऱ्यात चांगली कामगिरी करू शकतो. "

Web Title: That's the best that Virat Kohli did not play county cricket - Ganguly