दुबई : भारतीय कर्णधार विराट कोहली याने कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राखले आहे. आयसीसीने शुक्रवारी जाहीर केलेल्या यादीत विराट ९२८ गुणांसह अव्वल स्थानी कायम असून, उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या क्रमवारीतही सुधारणा होऊन तो आठव्या स्थानी आला आहे.विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. न्यूझीलंडचा दौरा हा भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे या मालिकेत विराट कोहलीसह भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे लक्ष असेल. विराटनंतर आॅस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ असून दोघांमध्ये १७ गुणांचा फरक आहे. चेतेश्वर पुजारा ७९१ गुणांसह सातव्या आणि रहाणे ७५९ गुणांसह आठव्या स्थानी आला.गोलंदाजी क्रमवारीमध्ये जसप्रीत बुमराह ७९४ गुणांसह सहाव्या स्थानावर असून रविचंद्रन अश्विन आठव्या व मोहम्मद शमी दहाव्या स्थानावर आहे. रवींद्र जडेजा ४३८ गुणांसह अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत तिसºया स्थानी आहे. फलंदाजांच्या यादीत श्रीलंकेचा अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूज १६ व्या स्थानावर आहे. (वृत्तसंस्था)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- कसोटी क्रमवारी : विराट कोहलीचे अव्वल स्थान कायम
कसोटी क्रमवारी : विराट कोहलीचे अव्वल स्थान कायम
भारतीय कर्णधार विराट कोहली याने कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राखले आहे.
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 04:42 IST