Join us

पाच युगातील दहा दिग्गज क्रिकेटपटूंचा होणार गौरव

cricketers : गुरुवारी आयसीसीने या विशेष यादीची घोषणा केली. भारत व न्यूझीलंडदरम्यान होणाऱ्या डब्ल्यूटीसी अंतिम लढतीपूर्वी हा निर्णय घेण्यात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 05:36 IST

Open in App

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पाच युगातील दहा दिग्गज क्रिकेटपटूंचा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता या प्रतिष्ठेच्या यादीत एकूण खेळाडूंची संख्या १०३ इतकी होईल. गुरुवारी आयसीसीने या विशेष यादीची घोषणा केली. भारत व न्यूझीलंडदरम्यान होणाऱ्या डब्ल्यूटीसी अंतिम लढतीपूर्वी हा निर्णय घेण्यात आला आहे.

या यादीत कसोटी क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या दिग्गजांचा समावेश होईल. सध्या आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये ९३ क्रिकेटपटूंचा समावेश आहे. यामध्ये दहा दिग्गजांची भर पडणार असून, प्रत्येक युगातील दोन खेळाडूंचा यामध्ये समावेश आहे.

आयसीसीचे कार्यवाहक मुख्य कार्यकारी ज्योफ अलारडाइस यांनी माहिती दिली की, ‘या विशेष यादीमध्ये पाच युगातील प्रत्येकी दोन खेळाडूंचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात येईल.’

टॅग्स :आयसीसी