Temba Bavuma Breaks All Time Captaincy Record : गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडिमवर रंगलेल्या कसोटी सामन्यातील विजयासह दक्षिण आफ्रिकेच्या संघासह कर्णधार टेम्बा बावुमानं नवा इतिहास रचला आहे. १२ कसोटी सामन्यानंतर एकही सामना न गावण्याचा खास वर्ल्ड रेकॉर्ड त्याच्या नावे झाला. 'चोकर्स'चा टॅग पुसून दक्षिण आफ्रिकेच्या संघाला WTC चॅम्पियन करणारा कर्णधाराने आतापर्यंत एकही कसोटी सामना गमावलेला नाही. संघाच्या कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून दक्षिण आफ्रिकेच्या संघाने १२ कसोटी पैकी ११ सामने जिंकले असून एक सामना अनिर्णित राहिला आहे. या सामन्यातही पावसाचा व्यत्यय आला होता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
असा पराक्रमक करणारा दक्षिण आफ्रिकेचाच नव्हे तर क्रिकेट जगतातील दुसरा कॅप्टन
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना गुवाहाटीच्या मैदानात खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाला ४०८ धावांनी पराभूत करत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने २५ वर्षांनी भारतीय मैदानात कसोटी सामना जिंकली. हान्सी क्रोन्ये याच्यानंतर टीम इंडियाला घरच्या मैदानात क्लीन स्पीप देणारा टेम्बा बावुमा क्रिकेट जगतातील दुसरा कर्णधार ठरला आहे.
दोन दिग्गजांना धोबी पछाड देत सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
कसोटी क्रिकेटमध्ये कॅप्टन्सीत अखंडीत विजयाची मालिका राखणाऱ्या कर्णधारांच्या यादीत याआधी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि ऑस्ट्रेलियन माजी कर्णधार लिंडसे हॅसेट हे दोघे संयुक्तरित्या अव्वलस्थानावर होते. १२ कसोटी सामन्यात त्यांनी सलग १०-१० कसोटी सामने जिंकले होते. टेम्बा बावुमाने १२ पैकी सलग ११ विजयासह या दोघांचा विक्रम मोडीत काढत नवा वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला आहे.
बावुमाच्या अनुपस्थितीत पटरीवरुन घसरली होती दक्षिण आफ्रिकेची गाडी, पण...
भारताच्या दौऱ्यावर येण्याआधी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पाकिस्तानचा दौरा केला. दुखापतीमुळे टेम्बा बावुमाशिवाय दक्षिण आफ्रिका संघ या दौऱ्यात खेळला. बावुमाच्या अनुपस्थितीत एडेन मार्करमनं संघाचे नेतृत्व केले. दोन कसोटी सामन्यातील एका सामन्यात संघावर पराभवाची नामुष्की ओढावली. पण टेम्बा बावुमा आला अन् दक्षिण आफ्रिकेचा संघाने पुन्हा विजयी सिलसिला सुरु केला.