Join us

टीम पेनने मैदानातच घातल्या पंचांना शिव्या...

पेनचा पारा चढला. तो पंच पॉल विल्सन यांच्याकडे गेला आणि अपशब्द पुटपुटला. पंचांनी पेनची तक्रार सामनाधिकाऱ्यांकडे केली तर या प्रकरणाची चौकशी होऊ शकते

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2021 03:03 IST

Open in App

सिडनी: चेतेश्वर पुजारा फलंदाजी करीत असताना चेंडू पुजाराच्या बॅट आणि पॅडला लागला. यावर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी जोरदार अपील केले. मैदानी पंचांनी पुजाराला नाबाद ठरवले. त्यानंतर पेनने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. तिसरे पंच जेव्हा रिप्ले पाहत होते, तेव्हा चेंडू हलका पुजाराच्या बॅटच्या जवळ असल्याचे दिसले. चेंडू बॅटला लागल्याचेही दिसत होते. तिसऱ्या पंचांनी मात्र मैदानी पंचांचा निर्णय कायम ठेवून पुजाराला नाबाद ठरवले. यामुळे टीम पेन हा चांगलाच भडकला. पेनचा पारा चढला. तो पंच पॉल विल्सन यांच्याकडे गेला आणि अपशब्द पुटपुटला. पंचांनी पेनची तक्रार सामनाधिकाऱ्यांकडे केली तर या प्रकरणाची चौकशी होऊ शकते.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया