Join us

टीम इंडियाचे ट्रेनर बासू चौकशीच्या फे-यात

भारतीय क्रिकेट संघाचे स्ट्रेंथ व अनुकूलन प्रशिक्षक शंकर बासू यांच्यावर त्यांच्या शिष्यांमध्ये समावेश असलेल्या सोहम देसाईची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (एनसीए) नव्या ट्रेनरपैकी एका स्थानी नियुक्तीच्या कारणास्तव दुटप्पी भूमिकेचे आरोप आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:47 IST

Open in App

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे स्ट्रेंथ व अनुकूलन प्रशिक्षक शंकर बासू यांच्यावर त्यांच्या शिष्यांमध्ये समावेश असलेल्या सोहम देसाईची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (एनसीए) नव्या ट्रेनरपैकी एका स्थानी नियुक्तीच्या कारणास्तव दुटप्पी भूमिकेचे आरोप आहेत.देसाई यापूर्वी बासू यांच्या व्यावसायिक उपक्रमासोबत जुळलेले होते, असे त्यांच्यावर आरोप आहेत. शुक्रवारी एनसीए उपसमितीच्या बैठकीदरम्यान महाव्यवस्थापक (खेळ विकास) एम. व्ही. श्रीधर यांना काही सदस्यांनी देसाई यांच्या नियुक्तीबाबत काही प्रश्न विचारले. देसाई बासू यांचे वैयक्तिक फिटनेस केंद्र ‘प्रायमल पॅटर्न्स’सोबत जुळलेले आहेत. यापूर्वी गुजरात रणजी संघासोबत जुळलेल्या देसाई यांनी अलीकडेच एनसीए ट्रेनर्सची परीक्षा उत्तीर्ण केली. या परीक्षेची प्रश्नपत्रिका बासू यांनी तयार केली होती. देसाई यांची नियुुक्ती दुटप्पी भूमिकेच्या कक्षेत येते किंवा नाही, याबाबत प्रश्न विचारण्यात आले. समितीच्या एका सदस्याने श्रीधर यांना देसाई यांच्या नियुक्तीबाबत विचारल्याचे वृत्त आहे.प्रशासकांच्या समितीने दुटप्पी भूमिकेबाबत कडक धोरण अवलंबले आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ पदाधिकाºयाने सांगितले की, ‘ही रंगतदार बाब आहे. प्रश्नपत्रिका तयार करणारी व्यक्ती टीम इंडियाची ट्रेनर असून परीक्षेत दुसरे स्थान मिळवणारी व्यक्ती त्याच्या वैयक्तिक जिममध्ये काम करणारी आहे. यामध्ये सीओए लक्ष घालतील, अशी आशा आहे.’ 

टॅग्स :बीसीसीआयभारतीय क्रिकेट संघभारत