WTC21 Final : है तैयार हम!; भारतीय खेळाडूंनी केली सरावाला सुरूवात, किवींच्या मनात भरली धडकी, Video

Team India's preparations are on in full swing for the WTC21 Final भारतीय संघाकडे एकापेक्षा एक सक्षम पर्याय आहेत. लंडनमध्ये पोहोचल्यानंतर भारतीय खेळाडूंनी गुरुवारी सरावाला सुरूवात केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 10:40 AM2021-06-10T10:40:06+5:302021-06-10T10:41:24+5:30

whatsapp join usJoin us
Team India's preparations are on in full swing for the WTC21 Final, Watch Video | WTC21 Final : है तैयार हम!; भारतीय खेळाडूंनी केली सरावाला सुरूवात, किवींच्या मनात भरली धडकी, Video

WTC21 Final : है तैयार हम!; भारतीय खेळाडूंनी केली सरावाला सुरूवात, किवींच्या मनात भरली धडकी, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

WTC21 Final : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आयसीसीची मानाची ट्रॉफी जिंकण्यासाठी उत्सुक आहे. आकडेवारीनुसार विराट हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार असला तरी त्याला अद्याप आयसीसी एकही प्रमुख स्पर्धा जिंकता आलेली नाही. 2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानकडून टीम इंडियाला हार मानावी लागली. आता ती चूक कसोटी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये विराट कदापी होऊ देणार नाही आणि जेतेपदाचा दुष्काळ संपवेल. चार महिन्यांच्या लंडन दौऱ्यासाठी बीसीसीआयनं 20 सदस्यीय संघ जाहीर केला आणि त्यांच्यासोबत 4 राखीव खेळाडूंचीही निवड केली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया प्रथमच परदेशात खेळणार आहे. WTC Final India’s Playing XI : कसोटी वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज; पण 20 पैकी अंतिम 11 मध्ये कोणाला मिळणार संधी?

18 ते 23 जून या कालावधीत रंगणाऱ्या कसोटी अजिंक्यपद फायनलमध्ये कोणत्या 11 खेळाडूंना खेळवायचे, यासाठी विराट आतापासून विचार करत आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, रिषभ पंत, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, आर अश्विन, रवींद्र जडेजा ही नावं अंतिम 11मध्ये पक्की मानली जात आहेत. पण, उर्वरित दोन जागांसाठी 11 उमेदवारा आहेत आणि त्यातून छाननी करणे संघासाठी डोकेदुखी ठरू शकते. पण, भारतीय संघाकडे एकापेक्षा एक सक्षम पर्याय आहेत. लंडनमध्ये पोहोचल्यानंतर भारतीय खेळाडूंनी गुरुवारी सरावाला सुरूवात केली. बीसीसीआयनं खेळाडूंच्या नेट प्रॅक्टिसचा व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यात भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास पाहून न्यूझीलंड संघाचं टेंशन नक्की वाढलं असेल. भारतीय क्रिकेटपटू तासाला कमावतात एक लाख; शतक, द्विशतकासाठी मिळते भारी रक्कम, बोनस वेगळा!


भारतीय संघ - विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्वि, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, लोकेश राहुल व वृद्धीमान सहा; राखीव खेळाडू - अभिमन्य इस्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागवास्वाला

Web Title: Team India's preparations are on in full swing for the WTC21 Final, Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.