टेस्ट सुरु असताना भारत-इंग्लंड यांच्यातील वनडे अन् टी-२० सामन्यांचे वेळापत्रक आलं समोर; जाणून घ्या सविस्तर

दोन्ही संघातील मर्यादित सामन्यांची मालिका कधी अन् कुठं रंगणार?  यासंदर्भातील सविस्तर माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 17:18 IST2025-07-24T17:13:50+5:302025-07-24T17:18:40+5:30

whatsapp join usJoin us
Team India's Limited Over Tour Of England 2026 Announced Five T20I And Three ODI | टेस्ट सुरु असताना भारत-इंग्लंड यांच्यातील वनडे अन् टी-२० सामन्यांचे वेळापत्रक आलं समोर; जाणून घ्या सविस्तर

टेस्ट सुरु असताना भारत-इंग्लंड यांच्यातील वनडे अन् टी-२० सामन्यांचे वेळापत्रक आलं समोर; जाणून घ्या सविस्तर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Team India's Limited Over Tour Of England 2026 Announced : भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टरच्या मैदानात रंगला आहे. हा सामना सुरु असतानाच इंग्लंड दौऱ्यातील टीम इंडियाच्या वनडे आणि टी-२० मालिकेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. चला तर मग जाणून घेऊयात दोन्ही संघातील मर्यादित सामन्यांची मालिका कधी अन् कुठं रंगणार?  यासंदर्भातील सविस्तर माहिती

भारत-इंग्लंड यांच्यातील वनडे-टी-२० मालिकेची घोषणा

इंग्लंड अँण्ड वेल्स क्रिकेट बोर्डासह बीसीसीआयकडून भारत-इंग्लंड यांच्यातील मर्यादित षटकांच्या मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघ २०२६ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेसह ३ सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. त्यानंतर दोन्ही संघ वनडे मालिका खेळताना दिसतील.  

भारत-इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिका

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्याची सुरुवात ही टी-२० मालिकेसह करेल. या मालिकेतील पहिला सामना १ जुलै २०२६ रोजी खेळवण्यात येईल.   त्यानंतर ४, ७ आणि ९ जुलै रोजी पुढचे सामने खेळवण्यात येतील. ११ जुलैला अखेरचा टी-२० सामना खेळवण्यात आल्यावर दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर १६ जुलैपासून वनडे मालिकेला सुरुवात होईल. या मालिकेतील अखेरचा सामना १८ जुलैला नियोजित आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी- २० मालिकेचे वेळापत्रक

  • १ जुलै : पहला टी २० सामना
  • ४ जुलै : दुसरा टी २० सामना
  • ७ जुलै : तिसरा टी २० सामना
  • ९ जुलै : चौथा टी २० सामना
  • ११ जुलै : पाचवा टी २० सामना

भारत विरुद्ध इंग्लंड वनडे मालिका

  • १२ जुलै : पहिला वनडे सामना
  • १६ जुलै : दुसरा वनडे सामना
  • १८ जुलाई : तीसरा वनडे सामना

Web Title: Team India's Limited Over Tour Of England 2026 Announced Five T20I And Three ODI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.