वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित शर्माकडे नेतृत्व, जसप्रीत बुमराहला आराम, तर या खेळाडूंचा समावेश 

India vs West Indies: वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी आज रात्री उशिरा टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. दुखापतीतून सावरत संघात पुनरागमन केलेल्या रोहित शर्माकडे दोन्ही संघांचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 23:18 IST2022-01-26T23:11:29+5:302022-01-26T23:18:31+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Team India's announcement for the series against West Indies, Rohit Sharma leads, Jaspreet Bumrah rested, | वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित शर्माकडे नेतृत्व, जसप्रीत बुमराहला आराम, तर या खेळाडूंचा समावेश 

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित शर्माकडे नेतृत्व, जसप्रीत बुमराहला आराम, तर या खेळाडूंचा समावेश 

मुंबई - वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी आज रात्री उशिरा टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. दुखापतीतून सावरत संघात पुनरागमन केलेल्या रोहित शर्माकडे दोन्ही संघांचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. तर विराट कोहलीसुद्धा दोन्ही मालिकांमध्ये खेळणार आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीला या मालिकांमधून आराम देण्यात आला आहे.

भारतीय संघाची निवड करताना प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांना दनही मालिकांमधून आराम देण्यात आला आहे. तर लोकेश राहुल दुसऱ्या वनडेपासून संघात दाखल होणार आहे. रवींद्र जडेजा अद्याप दुखापतीमधून सावरलेला नाही. त्यामुळे त्याचाही संघनिवडीमध्ये विचार करण्यात आलेला नाही. तर अक्षर पटेल याला केवळ टी-२० संघामध्येच स्थान देण्यात आले आहे.

भारताचा टी-२० संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि हर्षल पटेल. 

एकदिवसीय संघ 
रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान. 

Web Title: Team India's announcement for the series against West Indies, Rohit Sharma leads, Jaspreet Bumrah rested,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.