Join us  

'ड्रेसिंग रूममध्ये जाऊन खेळाडूंची भेट घेणं, मोठी गोष्ट'; विरेंद्र सेहवागही झाला PM मोदींचा फॅन!

आता टीम इंडियाचा माजी स्टार क्रिकेटर वीरेंद्र सेहवागनेही यासंदर्भात भाष्य केले आहे. पंतप्रधानांनी ड्रेसिंग रूममध्ये येणे, ही खूप मोठी गोष्ट आहे. कोणत्याही देशाचा पंतप्रधान जेव्हा असे करतो तेव्हा खेळाडूंचा उत्साह वाढतो, असे सेहवागने म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 6:16 PM

Open in App

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यात भारताचा सहा गडी राखून ऑस्ट्रेलियाने पराभव केला. या पराभावामुळे भारतीय संघाचे तिसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न अर्धवट राहिले. यामुळे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या डोळ्यात पाणीही दिसून आले. भारतीय संघाच्या या पराभावानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या खेळाडूंना धीर देण्यासाठी थेट ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले होते. याबद्दल मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा सारख्या स्टार खेळाडूंनी पंतप्रधान मोदींचे आभारही मानले होते. यासंदर्भातील व्हडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

सेहवागनं केलं पंतप्रधानांचं कौतुक -आता टीम इंडियाचा माजी स्टार क्रिकेटर वीरेंद्र सेहवागनेही यासंदर्भात भाष्य केले आहे. पंतप्रधानांनी ड्रेसिंग रूममध्ये येणे, ही खूप मोठी गोष्ट आहे. कोणत्याही देशाचा पंतप्रधान जेव्हा असे करतो तेव्हा खेळाडूंचा उत्साह वाढतो, असे सेहवागने म्हटले आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेसोबत बोलताना सेहवाग म्हणाला, 'एखाद्या देशाचा पंतप्रधान खेळाडूंना भेटून त्यांचा उत्साह वाढवतो, असे फार क्वचितच होते. महत्वाचे म्हणजे, एखादा संघ हरला आणि त्या देशाचे पंतप्रधान आपल्या खेळाडूंना भेटले, असे मी कधीच बघितले नाही. पंतप्रधानांनी ड्रेसिंग रूममध्ये जाऊन खेळाडूंचा उत्साह वाढवणे, हा त्यांचा अतिशय उत्तम निर्णय होता.

सहवाग म्हणाला, 'जेव्हा तुमचा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभव होतो, तेव्हा तुम्हाला तुमचे कुटुंबीय, चाहते आणि मित्रांच्या सपोर्टची अत्यंत आवश्यकता असते. माझ्या मते, पंतप्रधानांची ही कृती अत्यंत उत्तम होती. यामुळे खेळाडूंचा उत्साह वाढेल आणि आगामी विश्वचषकात ते अधिक चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतील. जो अंतिम सामना आपण जिंकू शकलो नाही, तो जिंकण्याचा प्रयत्न करू."

टॅग्स :विरेंद्र सेहवागनरेंद्र मोदीभारतीय क्रिकेट संघवन डे वर्ल्ड कप