Join us

Video: 'माझ्याबद्दल खुप वाईट बोललं गेलं, पण मी...' PM मोदींसमोर हार्दिकने मांडल्या वेदना

Team India With PM Modi : विश्वचषक जिंकून भारतात परतल्यानंतर टीम इंडियाने सर्वप्रथम पंतप्रधान मोदींची भेट घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 18:49 IST

Open in App

Team India With PM Modi : टीम इंडियाने 29 जून रोजी दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करुन T20 विश्वचषकावर 17 वर्षांनंतर नावर कोरले. या विजयानंतर टीम इंडियाचे भारतात भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. मुंबईतील विजयी परेडमध्ये हजारो-लाखो चाहत्यांनी एकच जल्लोष केला. तत्पुर्वी भारतीय खेळाडूंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानी त्यांच्या निवासस्थानी सर्व खेळाडूंशी आपुलकीचा संवाद साधला. यादरम्यान हार्दिक पांड्या खुप भावुक झालेला दिसला.

वनडे विश्वचषक 2023 नंतर मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरुन हटवून संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे सोपवले होते. त्यामुळे रोहितच्या चाहत्यांनी हार्दिकला प्रचंड ट्रोल केले. त्याला स्टेडियममध्येही खुप चिडवण्यात आले. याशिवय मुंबई इंडियन्स संघानेही खुप खराब कामगिरी केली. चाहत्यांनी याचे खापरही पांड्यावरच फोडले. अनेक दिग्गजांनी हार्दिकला पाठिंबा दिला, पण चाहत्यांनी हार्दिकची प्रचंड खिल्ली उडवली. याच मुद्द्यावर बोलताना हार्दिक पंतप्रधान मोदींसमोर भावुक झाला.

काय म्हणाला हार्दिक पांड्या?"गेले 6 महिने माझ्यासाठी खूप मनोरंजक होते. आयुष्यात खूप चढ-उतार आले, लोकही माझ्याबद्दल खुप वाईट बोलले, बऱ्याच गोष्टी घडल्या. पण मी माझ्या खेळातूनच उत्तर देण्याचे ठरवले होते. त्यामुळे मी खंबीर राहिलो आणि कठोर परिश्रम केले," अशा भावना पांड्याने व्यक्त केल्या. हार्दिकची व्यथा ऐकून पीएम मोदींनी त्यांची कौतुक केले. "तुझी शेवटची ओव्हर ऐतिहासिक ठरली," अशी प्रतिक्रिया मोदींनी दिली. 

टॅग्स :हार्दिक पांड्यानरेंद्र मोदीट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024