Join us

भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 

भारतीय संघाचे लीग सामने न्यूयॉर्कला होणार आहेत. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंड येथे होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 19:29 IST

Open in App

इंडियन प्रीमियर लीग (IPL) चा साखळी सामन्यांचा टप्पा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे २१ मे रोजी भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी अमेरिकेला रवाना होईल. जे खेळाडू आयपीएल २०२४ प्ले ऑफसाठी पात्र ठरलेल्या संघांचा भाग नसतील, ते पहिल्या बॅचसह अमेरिकेसाठी प्रवास करतील. त्यांच्यासोबत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या सपोर्ट स्टाफच्या सर्व सदस्यांचा समावेश आहे. २६ मे रोजी आयपीएल फायनल संपल्यानंतर दुसरी तुकडी अमेरिकेला रवाना होईल.

भारतीय संघाचे लीग सामने न्यूयॉर्कला होणार आहेत. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंड येथे होणार आहे. त्यानंतर पाकिस्तान ( ९ जून), अमेरिका ( १२ जून) व कॅनडा ( १५ जून)  असे भारताचे सामने होणार आहेत.  भारतीय संघाचे न्यूयॉर्कमध्ये शिबिर घेण्यात येणार आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मॅनहॅटनपासून ३० किमी अंतरावर असलेल्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये सराव सामन्यांची व्यवस्था करत आहे. भारतीय संघासाठी जवळपास सहा ड्रॉप-इन सराव खेळपट्ट्या असणार आहे.

दरम्यान, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने ( ECB ) म्हटले आहे की, आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या त्यांच्या खेळाडूंना २२ मे पूर्वी मायदेशी पोहोचावे लागेल. इंग्लंड पाकिस्तानविरुद्धच्या चार सामन्यांच्या मालिकेत सहभागी होणार आहे आणि इंग्लिश बोर्डाच्या या निर्णयाचा अर्थ अनेक इंग्लिश खेळाडू  आयपीएल प्ले-ऑफ सामन्यांना मुकणार आहेत. 

भारताचा वर्ल्ड कप संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), हार्दिक पांड्या ( उप कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह; राखीव खेळाडू - शुबमन  गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलिल अहमद 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024भारतीय क्रिकेट संघबीसीसीआय