Team India World Cup : भारतीय संघाला सर्वात जास्त प्रवास करावा लागणार; फायनलपर्यंत दम निघणार

भारतीय संघ ४४ दिवसांच्या कालावधीत ९ शहरांमध्ये प्रवास करणार आहे. भारताचा प्रत्येक सामना हा ३ ते ४ दिवसांच्या गॅपने होणार आहे आणि इथे भारतीय संघ दमणार आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 11:32 AM2023-06-28T11:32:39+5:302023-06-28T11:33:26+5:30

whatsapp join usJoin us
Team India Warm-Up Schedule: Team India will be the most travelled team among top contenders in World Cup 2023, Covering a distance of 8400 KM in 9 cities for 9 matches in 34 days | Team India World Cup : भारतीय संघाला सर्वात जास्त प्रवास करावा लागणार; फायनलपर्यंत दम निघणार

Team India World Cup : भारतीय संघाला सर्वात जास्त प्रवास करावा लागणार; फायनलपर्यंत दम निघणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Team India Warm-Up Schedule : भारतीय संघ वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यापूर्वी दोन सराव सामने खेळणार आहे. गुवाहाटी येथे चार सराव सामने होणार आहेत आणि त्यापैकी एक ३० सप्टेंबरला भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात होणार आहे. त्यानंतर ३ ऑक्टोबरला तिरुअनंतपूरम येथे क्वालिफायर संघाशी भारतीय संघ खेळेल. भारतीय संघ ४४ दिवसांच्या कालावधीत ९ शहरांमध्ये प्रवास करणार आहे. भारताचा प्रत्येक सामना हा ३ ते ४ दिवसांच्या गॅपने होणार आहे आणि इथे भारतीय संघ दमणार आहे.  

२ कसोटी, ८ ट्वेंटी-२० अन् किती वन डे? वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी टीम इंडियाचा खेळणार आणखी एक मालिका 


गुवाहाटी येथे ३० सप्टेंबरला सराव सामना खेळल्यानंतर दुसऱ्या सराव सामन्यासाठी भारती संघ ३४०० किलोमीटर प्रवास करून तिरुअनंतपूरमला पोहोचणार. त्यानंतर शेजारीच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या मुख्य लढतीसाठी चेन्नईत जाणार. या सामन्यानंतर अफगाणिस्तानविरुद्ध खेळण्यासाठई २२०० किमीचा प्रवास करून दिल्लीत जावे लागणार. तिथून पुढे पाकिस्तानविरुद्ध ९५० किमीचा प्रवास करून अहमदाबादला पोहोचावे लागणार. त्यानंतर ६५० किमी प्रवास करून पुणे अन् पुढे १९०० किमी प्रवास करून धर्मशाला येथे भारताला खेळावे लागणार आहे. 


इंग्लंडविरुद्धच्या लढतीपूर्वी रोहित शर्माच्या संघाला सात दिवसांची विश्रांती मिळणार आहे. लखनौ-मुंबई-कोलकाता-बंगळुरू असा प्रवास भारत पुढे करेल. भारतीय संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरल्यास त्यांना पुढे मुंबई ( जर पाकिस्तानविरुद्ध लढत नसल्यास) किंवा कोलकाता ( पाकिस्तानविरुद्ध लढतीसाठी) असा प्रवास करायचा आहे.  भारतीय संघ ३४ दिवसांत ९ सामन्यांसाठी ९ शहरांमध्ये ८४०० किमी प्रवास करेल. उपांत्य फेरी आणि फायनलमध्ये प्रवेश निश्चित झाल्यास हा प्रवास ९७०० किमी इतका होईल.  


वर्ल्ड कप स्पर्धेतील भारतीय संघाचं वेळापत्रक 

  • ८ ऑक्टोबर- भारत वि. ऑस्ट्रेलिया, चेन्नई
  • ११ ऑक्टोबर - भारत वि. अफगाणिस्तान. दिल्ली
  • १५ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, अहदाबाद
  • १९ ऑक्टोबर - भारत वि. बांगलादेश, पुणे
  • २२ ऑक्टोबर - भारत वि. न्यूझिलंड, धर्मशाला
  • २९ ऑक्टोबर- भारत वि. इंग्लंड, लखनौ
  • २ नोव्हेंबर - भारत वि. क्वालिफायर २, मुंबई
  • ५ नोव्हेंबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, कोलकाता
  • ११ नोव्हेंबर - भारत वि. क्वालिफायर १, बंगळुरू

 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: Team India Warm-Up Schedule: Team India will be the most travelled team among top contenders in World Cup 2023, Covering a distance of 8400 KM in 9 cities for 9 matches in 34 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.