Join us

दिग्गज वळले रणजीकडे! सात वर्षांनी ऋषभ पंत खेळणार, पण कर्णधारपद 'ज्युनियर' खेळाडूकडे!

मानेच्या दुखापतीमुळे विराट कोहलीचे दिल्लीकडून खेळणे मात्र अनिश्चित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 08:04 IST

Open in App

नवी दिल्ली: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला सौराष्ट्र संघाविरुद्ध राजकोट येथे होणाऱ्या पुढील रणजी चषक लढतीसाठी दिल्लीच्या २२ सदस्यीय प्राथमिक संघात निवडण्यात आले आहे. पण, आता त्याला दुखापत झाल्याने वृत्त आल्यामुळे त्याचे खेळणे अनिश्चित आहे.

सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यादरम्यान कोहलीला मानेला किरकोळ दुखापत झाल्याचे त्याने दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले असल्याचे समजते. तेथे फिजिओने त्याच्यावर उपचार केले होते. त्यामुळे तो २३ जानेवारीपासून सुरू होणारा रणजी सामना खेळेल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तो खेळेल की काही दिवस राजकोटला सरावासाठी जाईल हे 'डीडीसीए' अध्यक्ष रोहन जेटली यांना कळवल्यावरच समजेल. कोहलीने शेवटचा रणजी सामना २०१२मध्ये खेळला होता. त्याच्या एका वर्षांनंतर सचिनने त्याचा शेवटचा रणजी सामना हरयाणाविरुद्ध खेळला.

ऋषभ पंत खेळणार रणजी सामना

यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत सात वर्षांनंतर रणजी सामना खेळणार आहे; पण त्याने नेतृत्व करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आयुष बडोनी कर्णधार असेल, डीडीसीएच्या एका सदस्याने सांगितले की, सध्याच्या कर्णधारानेच नेतृत्व करावे, असे ऋषभने म्हटले आहे. कारण, ऋषभ सलग उपलब्ध नसेल. त्यामुळे नेतृत्वात बदल करू नये, अशी पंतची भूमिका आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीआधी रोहितचा सराव

  • भारताचा कर्णधार रोहित शर्मा इंग्लंडविरुद्ध आगामी वनडे मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफीआधी पांढऱ्या चेंडूच्या प्रारूपात आपली फलंदाजी सुधारण्यासाठी कठोर मेहनत घेत आहे.
  • इन्स्टाग्रावर प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडीओत ३७ वर्षीय रोहित सराव सत्रात फ्लिक, ड्राइव्ह, पूल आणि उंच फटके मारताना दिसला.
  • रोहित मुंबई रणजी संघासोबत सराव करत आहे. मुंबईला २३ जानेवारी रोजी जम्मू-काश्मीरविरुद्ध खेळायचे आहे; पण रोहितचे खेळणे अद्याप निश्चित नाही.

जैस्वाल, गिल खेळणार

बीसीसीआयने सर्व केंद्रीय करार असलेल्या खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणे अनिवार्य केले आहे. यशस्वी जैस्वाल मुंबईसाठी, शुभमन गिल पंजाबसाठी खेळणार आहे.

रणजीकडे कानाडोळा

बॉर्डर-गावसकर मालिकेत बिसाळ कामगिरी केल्यापासून भारतीय फलंदाजांवर चोहोबाजूंनी भरपूर टीका सुरू आहे. त्यामुळे आता स्थानिक क्रिकेटपासून पळ काढणान्या स्टार क्रिकेटपटूंची पावले पुन्हा रणजीकडे वळली आहे. भारतीय दिग्गज आगामी रणजी सामन्यात मैदानात दिसू शकतात. मात्र, याच दिग्गजांनी शेवटचा रणजी सामना कोणत्या वर्षी खेळला होता यावरही सध्या चर्चा होते आहे.

भारतीय दिग्गज शेवटचा रणजी सामना कधी खेळले होते?

टॅग्स :रणजी करंडकरोहित शर्माविराट कोहलीलोकेश राहुलरिषभ पंतशुभमन गिल