Vaibhav Suryavanshi Ayush Mhatre, U19 Asia Cup: भारतीय क्रिकेटमधील सर्वात युवा १४ वर्षीय सलामीवीर वैभव सूर्यवंशी याला पुन्हा एकदा टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली आहे. आशिया कप रायझिंग स्टारमध्ये खेळल्यानंतर वैभव आता आशिया कपमध्ये खेळताना दिसणार आहे. यावेळी तो १९ वर्षांखालील आशिया कपमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. १९ वर्षांखालील संघात कर्णधारपदाची जबाबदारी महाराष्ट्राच्या मराठमोळ्या आयुष म्हात्रेकडे सोपवण्यात आली आहे.
उपकर्णधार कोण बनले?
बीसीसीआयने शुक्रवारी (२८ नोव्हेंबर) १९ वर्षांखालील आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा केली. १२ ते २१ डिसेंबर दरम्यान दुबई येथे होणाऱ्या एकदिवसीय स्पर्धेसाठी भारतीय संघात १५ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्यात वैभव सूर्यवंशी सध्या सर्वात लोकप्रिय खेळाडू आहे. चार खेळाडूंना स्टँडबाय म्हणून निवडण्यात आले आहे. पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या तयारीसाठी ही स्पर्धा महत्त्वाची आहे.
मराठमोळ्या कर्णधाराची परीक्षा
१४ वर्षीय स्फोटक सलामीवीर वैभव सूर्यवंशी याने आधीच जगभरात आपला ठसा उमटवला आहे. कर्णधारपद आणि उपकर्णधारपदाची जबाबदारी तुलनेने वरिष्ठ खेळाडूंना देण्यात आली आहे. संघाचे नेतृत्व १७ वर्षीय आयुष म्हात्रे करणाप आहे. त्याने या वर्षी जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यावर १९ वर्षांखालील संघाचे नेतृत्व केले होते. विहान मल्होत्राची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आयुष म्हात्रेसाठी कर्णधारपद ही परीक्षा असणार आहे.
भारताच्या १९ वर्षांखालील संघ
आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा (उपकर्णधार), वैभव सूर्यवंशी, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंश सिंग, युवराज गोहिल, कनिष्क चौहान, खिलन ए पटेल, नमन पुष्पक, डी दीपेश, हेनिल पटेल, किशनसिंग जॉर्ज, किशन कुमार, जॉर्ज कुमार, युवराज गोहिल.
स्टँडबाय- राहुल कुमार, हेमचुडेसन जे, बीके किशोर, आदित्य रावत