Team India: टी-२० विश्वचषकात टीम इंडियाकडून शेवटचा खेळताना दिसेल हा खेळाडू, करू शकतो निवृत्तीची घोषणा

Team India: या महिन्यात अॉस्ट्रेलियामध्ये सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघातील एक सिनियर खेळाडू त्याचा शेवटचा टी-२० विश्वचषक खेळताना दिसणार आहे. त्यानंतर तो त्याच्या निवृत्तीची घोषणा करू शकतो. हा खेळाडू म्हणजे दिनेश कार्तिक.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2022 12:39 PM2022-10-01T12:39:22+5:302022-10-01T12:40:10+5:30

whatsapp join usJoin us
Team India: The player who will be seen playing for the last time for Team India in T20 World Cup, may announce his retirement | Team India: टी-२० विश्वचषकात टीम इंडियाकडून शेवटचा खेळताना दिसेल हा खेळाडू, करू शकतो निवृत्तीची घोषणा

Team India: टी-२० विश्वचषकात टीम इंडियाकडून शेवटचा खेळताना दिसेल हा खेळाडू, करू शकतो निवृत्तीची घोषणा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई - या महिन्यात अॉस्ट्रेलियामध्ये सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघामध्ये खेळाडूंची निवड करताना निवड समितीने युवा आणि अनुभवी खेळाडूंचा योग्य ताळमेळ राखला आहे. दरम्यान, या संघातील एक सिनियर खेळाडू त्याचा शेवटचा टी-२० विश्वचषक खेळताना दिसणार आहे. त्यानंतर तो त्याच्या निवृत्तीची घोषणा करू शकतो.

हा खेळाडू म्हणजे दिनेश कार्तिक.दिनेश कार्तिकने  प्रचंड मेहनत घेत सातत्यपूर्ण कामगिरी करत भारतीय संघात पुनरागमन केले आहे. त्याने यावर्षीच्या आयपीएलमध्ये धमाकेदार खेळ केला होता. त्यानंतर भारतीय संघात स्थान मिळाल्यापासून फिनिशरची भूमिका चोखपणे बजावत आहे.

३७ वर्षिय दिनेश कार्तिक हा भारतीय संघातील सर्वात सिनियर खेळाडू आहे. तीन वर्षांनंतर त्याने भारतीय संघात पुनरागमन केले आहे. मात्र अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्याला रिषभ पंत कडून कडवी टक्कर मिळत आहे. अशा परिस्थितीत यंदाच्या टी-२० विश्वचषकानंतर दिनेश कार्तिक क्रिकेटला रामराम ठोकू शकतो.

उल्लेखनीय बाब म्हणजे भारताने २००७ मध्ये जेव्हा पहिला टी-२० विश्वचषक जिंकला होता. तेव्हा. त्या संघामध्ये दिनेश कार्तिकचा समावेश होता. दिनेश कार्तिकने भारताकडून २६ कसोटी, ९४ एकदिवसीय आणि ५१ टी-२० सामने खेळले आहेत.

Web Title: Team India: The player who will be seen playing for the last time for Team India in T20 World Cup, may announce his retirement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.