मुंबई: सध्याच्या घडीला भारतीय क्रिकेटरसिकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या कर्णधार विराट कोहलीची प्रत्येक गोष्ट कायमच चर्चेचा विषय असते. अनेकजण हेअरस्टाईल , बियर्ड स्टाईल किंवा टॅटूच्याबाबतीत विराटला फॉलो करतात. विराट कोहलीला अनेक उंची वस्तू खरेदी करण्याची हौस आहे. सध्या त्याने खरेदी केलेले एक वॉलेट चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वी विराटच्या हातात काळ्या रंगाचे LOUIS VUITTON ZIPPY XL हे वॉलेट दिसले होते. या वॉलेटची किंमत तब्बल 85 हजार इतकी आहे. ही किंमत ऐकून अनेकांचे डोळे विस्फारल्यावाचून राहणार नाहीत.
यापूर्वी विराट कोहली त्याच्याकडे असणाऱ्या गाड्यांच्या कलेक्शनमुळे ही चर्चेत आला होता. त्याच्या ताफ्यात बीएमडब्ल्यू एक्स 6 आणि ऑडी आर-8 यासारख्या अलिशान गाड्यांचा समावेश आहे.
सध्याच्या घडीला विराट कोहली भारतीय संघातील सर्वोत्तम खेळाडू आहे. त्यामुळे क्रिकेटव्यतिरिक्त तो जाहिरातींच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणावर पैसा कमावतो. कोहलीने आपल्या बॅटवर एमआरएफ कंपनीचा लोगो लावण्यासाठी तब्बल आठ कोटी रूपये इतके मानधन घेतले होते. याशिवाय, वस्त्रप्रावरणे आणि शूजच्या जाहिरातींच्या माध्यमातून कोहली कोट्यवधींची कमाई करतो.
विराटने नुकतेच गुरूग्राम येथे अलिशान बंगला विकत घेतला होता. भारतीय संघात खेळायला लागल्यापासून विराट बरेच दिवस दिल्लीत आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होता. काही दिवसांपूर्वीच त्याने गुरुग्राम येथे 10 हजार स्क्वेअर फुटांचा बंगला विकत घेतला. या बंगल्याची किंमत साधारण 80 कोटी इतकी आहे.
![]()